Ashok Kharat police custody: “खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! ५ जणांचा ‘नरबळी’? कोर्टात नेमकं काय घडलं?

24 Mar 2026 17:49:07
 
Ashok Kharat police custody
 
मुंबई : (Ashok Kharat police custody) राज्याला हादरवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत असून न्यायालयाने त्याला आणखीन ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक पोलिसांनी मंगळवार दि. २४ मार्च रोजी खरातला न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत आरोपीविरोधात अनेक ठोस पुरावे असल्याचा दावा केला. तसेच, अनेक पीडित महिला पुढे येत असल्यामुळे तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली आहे. (Ashok Kharat police custody)
 
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘नरबळी’चा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पिस्तुलातील ५ गोळ्या फायर झालेल्या आढळल्याने ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय कोर्टात मांडण्यात आला. याशिवाय आरोपीकडून हरणाची कस्तुरी, वाघाचे कातडे, साप आणि शिंगे जप्त करण्यात आली आहेत. (Ashok Kharat police custody)
 
हेही वाचा: Ashok Kharat case: ‘खरात फाईल्स’ उघड! ९ लाखांचं ‘मध’, नकली नाग…, नेते-उद्योजकांना...  
 
तपासादरम्यान अशोक खरात याने ‘सिद्ध दोष पूजा’च्या नावाखाली अघोरी विधी केल्याचा आरोप असून, या वस्तूंचा वापर त्यासाठी केला जात असल्याचा संशय आहे. तसेच, त्याच्याकडे २१ जिवंत काडतुसे आणि ५ वापरलेली काडतुसे सापडल्याची माहितीही समोर आली आहे. (Ashok Kharat police custody)
 
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, घरझडतीदरम्यान राजमुद्रा, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर संशयास्पद साहित्य सापडले आहे. आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. ६७ वर्षीय आरोपीचा महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ पुरावा असल्याचाही दावा करण्यात आला. (Ashok Kharat police custody)
 
हे वाचलात का?: Tejaswi Satpute: खरात प्रकरणाची ‘लेडी सिंघम’ कोण? तेजस्वी सातपुते यांचा आतापर्यंतचा प्रवास... 
 
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी या सर्व आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत. “७ दिवसांच्या तपासात अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. पिस्तुलाला परवाना होता. सर्व तपास पूर्ण झाल्यावर आणखी कोठडी का हवी?” असा सवाल त्यांनी न्यायालयात उपस्थित केला. तसेच, पुराव्यांच्या सादरीकरणावरही त्यांनी आक्षेप घेतला. (Ashok Kharat police custody)
 
दरम्यान, या प्रकरणातील वाढत्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष तपासाकडे लागले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ashok Kharat police custody)
 
 
Powered By Sangraha 9.0