मुंबई : (Ashok Kharat case) भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी संपूर्ण राज्य हादरले असून रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचारांसोबतच राजकीय नेते आणि उद्योजकांनाही लाखोंचा गंडा घातल्याची नव नवीन माहिती तपासातून पुढे येत आहे. (Ashok Kharat case)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने ‘तुक्रीच्या समुद्रातून मिळालेलं खास मध’ असल्याचा दावा करत एक किलो मधाची बाटली तब्बल ९ लाख रुपयांना विकत होता. लैंगिक समस्या दूर करण्यासाठी हे ‘चमत्कारी मध’ असल्याचं सांगून तो लोकांची फसवणूक करत होता. इतकंच नाही तर, नकली रबराचा नाग आणि वाघाचं कातडं दाखवून महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचेही त्याच्यावर आरोप आहेत. नाशिकमधील ईशानेश्वर मंदिर परिसरात नेऊन अघोरी विधीच्या नावाखाली गैरप्रकार केले जात होते आणि साध्या चिंचोक्यांना ‘रत्न’ असल्याचे भासवून ते लाखोंमध्ये विकल्याचाही प्रकार उघड झाला आहे. (Ashok Kharat case)
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून २०१२ बॅचच्या आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते या तपासाचे नेतृत्व करत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या खरातकडून ५८ अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहितीही समोर आली आहे. (Ashok Kharat case)
दरम्यान, अशोक खरात याच्यावर आणखी गंभीर आरोप नोंदवले जात आहेत. एका गर्भवती महिलेचे ‘पूजा विधी’च्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा पीडितेकडून करण्यात आला आहे. (Ashok Kharat case)
त्याशिवाय पोलीसांच्या तपासात नाशिकच्या मिरगाव परिसरात त्याचा फार्महाऊस असल्याचे समोर आले असून, तो बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असल्याचेही आरोप आहेत. पोलिसांनी फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांची आणि संबंधितांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, तपासासाठी नागरिकांकडून माहिती मागवण्यात आली असून, 9503270224 आणि 7775816389 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचे SIT प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. (Ashok Kharat case)