रुपाली चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती

21 Mar 2026 17:01:40
Rupali Chakankar
 
मुंबई : (Rupali Chakankar) भोंदुबाबा खरात प्रकरणानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला. दरम्यान, आता हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
 
नाशिकमधली भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात याला फसवणूक आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे त्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर, चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 
हेही वाचा : अशोक खरात प्रकरणात बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी; खा. सुनील तटकरे
 
यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0