मुंबई : (LPG shortage) देशातील एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी, १७ मार्च रोजी एमटी नंदा देवी हा एलपीजी टँकर वाडिनार बंदर येथे दाखल झाला. या टँकरमध्ये ४६,५०० मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी असून, आता अँकरेजवर शिप-टू-शिप ट्रान्सफर प्रक्रिया करण्यात येणार आहे. (LPG shortage)
दीनदयाल पोर्ट प्राधिकरणाचा पुढाकार...
दीनदयाळ बंदर प्राधिकरण (DPA) चे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांनी जहाजाला भेट देत कॅप्टन आणि क्रूशी संवाद साधला व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. (LPG shortage)
हेही वाचा : Nanda Devi LPG Ship: एलपीजी इंधनवाहू नौका शिवालिक भारतात पोहोचली..
महत्त्वाचे म्हणजे, हे जहाज होर्मुझची सामुद्रधुनी या युद्धग्रस्त सागरी मार्गातून सुरक्षितपणे पार होत भारतात पोहोचले आहे. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास अत्यंत धोकादायक मानला जात असताना नंदा देवी सुरक्षित भारतात पोहोचली आहे. (LPG shortage)
यापूर्वी १६ मार्च रोजी एमटी शिवालिक हा एलपीजी टँकर मुंद्रा पोर्ट येथे दाखल झाला होता. या टँकरमध्ये सुमारे ४६,००० मेट्रिक टन एलपीजी होते, जे सुमारे ३२.४ लाख घरगुती सिलेंडर (१४.२ किलो) इतके आहे. अधिकाऱ्यांच्या मते, एकाच जहाजातून भारताच्या जवळपास एका दिवसाची एलपीजी गरज पूर्ण होऊ शकते. (LPG shortage)
टंचाईवर तात्पुरता दिलासा...
मध्य-पूर्वेतील संकटामुळे एलपीजी पुरवठा प्रभावित झाला असताना, ‘नंदा देवी’ आणि ‘शिवालिक’ ही दोन्ही जहाजे देशासाठी महत्त्वाची ठरत आहेत. गुजरातमधील बंदरांद्वारे हा गॅस देशभर वितरित केला जाणार असून, घरगुती ग्राहकांना काही दिवसांसाठी तरी टंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (LPG shortage)