लखनऊ : (UP Gas Cylinder Raid) उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते सोनू कन्नौजिया यांच्या रिसॉर्टवर पोलीसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात हे सिलेंडर काळ्या बाजारासाठी साठवून ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (UP Gas Cylinder Raid)
१४ मार्च २०२६ रोजी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने लखनऊमधील मोहन रोड परिसरातील अभिनंदन रिसॉर्ट येथे छापा टाकला. या कारवाईत एका ट्रकमधून एकूण ८८ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यामध्ये ६५ रिकामे घरगुती सिलेंडर, ९ भरलेले सिलेंडर आणि १४ छोटे सिलेंडर आढळून आले. (UP Gas Cylinder Raid)
तपासात समोर आले की, या सिलेंडरची कोणतीही अधिकृत नोंद नव्हती. विशेष म्हणजे ही गॅस एजन्सी सोनू कन्नौजिया यांच्या पत्नी मंजू कन्नौजिया यांच्या नावावर असीम भारत गॅस एजन्सी म्हणून नोंदणीकृत आहे. मात्र जप्त केलेल्या सिलेंडरबाबत वैध कागदपत्रे किंवा रिफिल व्हाउचर सादर करण्यात आले नाहीत. (UP Gas Cylinder Raid)
या प्रकरणी काकोरी पोलिस ठाण्यात आवश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सोनू कन्नौजिया, मंजू कन्नौजिया यांच्यासह जमील अहमद, साहिल आणि मुन्ना उर्फ इक्तदा हुसैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (UP Gas Cylinder Raid)
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने भारतातही गॅस टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडर साठवून काळाबाजार करण्याच्या प्रकारांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. (UP Gas Cylinder Raid)