जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; लोकभवनमध्ये घेतली राज्यपालपदाची शपथ

11 Mar 2026 15:31:39
Jishnu Dev Varma
 
मुंबई : (Jishnu Dev Varma) महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.
 
यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
हेही वाचा : सायबर फसवणूकीच्या जनजागृतीसाठी ४३ कोटी रुपयांची तरतूद; गृहराज्यमंत्री योगेश कदम
 
जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे अभिनंदन केले.
 
 
Powered By Sangraha 9.0