मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल ९६ धावांनी पराभूत करत ट्रॉफी पटकावली. या शानदार विजयानंतर भारतीय खेळाडूंनी आपल्या कुटुंबीय आणि जोडीदारांसोबत मैदानावर सेलिब्रेशन केले. त्यांच्या या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली संघ विजेता ठरला. या ऐतिहासिक क्षणी त्यांची पत्नी देविशा शेट्टी आणि कुटुंबीयही स्टेडियममध्ये उपस्थित होते. सूर्यकुमार आणि देविशा यांनी ७ जुलै २०१६ रोजी मुंबईत दक्षिण भारतीय पद्धतीने विवाह केला होता.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या अभिनेत्री आणि मॉडेल महिका शर्मा सोबत चर्चेत आहे. २०२६ च्या विश्वचषक विजयानंतर हार्दिकने आपल्या यशाचे श्रेय माहिका शर्माला दिले. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
टि-२० विश्वचषक 2026 मध्ये तिलक वर्माने उत्तम कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या दमदार विजयानंतर तिलक वर्माने त्याच्या कुटुंबासह आपला विजय साजरा केला.
भारतीय संघाला आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने विजेतेपद जिंकून देणारा संजू सँमसन त्यांची पत्नी चारुलता रमेश सोबत मैदानावर आनंद साजरा करताना दिसला.
भारतीय संघाच्या या सेलीब्रेशन मध्ये इशान किशन आणि अदिती हुंडिया यांचे ही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अदिती ही एक माँडेल आणि उघोजिका आहे. ती मिस इंडिया फायनलिस्ट असुन २०१८ तीने मिस दिवा सुप्रानँशनल स्पर्धेची विजेती आहे. याशिवाय तिने भारताचे मिस दिवा सुप्रानँशनल २०१९ चे प्रतिनिधित्व ही केले होते.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विजयानंतर तो पत्नी संजना गणेशनसोबत सेलिब्रेशन करताना दिसला. या दोघांचे लग्न १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात झाले होते.
संघाचा खेळाडू अक्षर पटेल याने पत्नी मेहा पटेल आणि मुलासोबत हा विजय साजरा केला.
भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यानेही कुटुंबासोबत विजय साजरा केला. विजयानंतर त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या रील्सना चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यानंतर वरुण चक्रवर्ती यानेही कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला.