Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचे? कंटेंट क्रिएटर्समध्ये मतभेद, सोशल मीडियावर रंगली चर्चा

Total Views |
Navi Mumbai International Airport
 
मुंबई : (Navi Mumbai International Airport) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) नामकरणासंदर्भात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.(Navi Mumbai International Airport)
 
न्यायालयाने काय म्हटलं?
 
मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, "कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पाचे नामकरण अथवा नाव बदलण्याचा निर्णय हा पूर्णतः प्रशासकीय स्वरूपाचा असतो. त्यामुळे न्यायालय अशा प्रकारचे आदेश देऊ शकत नाही. या कारणास्तव सदर जनहित याचिका फेटाळण्यात आली."
 
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर या विषयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि गेमर ‘श्रीमान लेजेंड’ म्हणजेच सिद्धांत जोशी आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि कलाकार विनायक माळी या दोघांनी त्यांच्या एका व्लॉगमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. या दोघांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. श्रीमान लेजेंडने नवी मुंबई विमानतळावरुन प्रवास केल्याचा ट्रॅव्हल व्लॉग युट्यूबवर अपलोड केला होता त्यावरुन नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिले पाहिजे अशा मागणीच्या कमेंट्स केल्या. या कमेंट्स वाचल्यानंतर श्रीमान लेजेंडने या चर्चेवर कमेंट सेक्शनमध्ये स्वतःची भूमिका मांडली.(Navi Mumbai International Airport)
 
हेही वाचा : Sonu Sood: ऑनलाइन गेमच्या व्यसनाने गाझियाबादमध्ये तीन बहिणींचा मृत्यू, सोनू सूदची भावनिक प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला? 
 
‘श्रीमान लेजेंड’ नेमकं काय म्हणाला?
 
त्यानं कमेंट्समध्ये दि. बा. पाटील यांच्या कार्याचा सन्मान करत सांगितले की, "तुमच्या सर्वांच्या भावनांचा आदर करून मला एक गोष्ट इथे व्यक्त करावी वाटते आणि हा पूर्णपणे माझा वैयक्तिक विचार आहे की, दि. बा. पाटील हे खूप मोठे लोकनेते होऊन गेले आहेत आणि त्यांच्या कामगिरीला मनापासून नमन आहे. त्यांच्या लढ्यामुळेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळाल्या आणि त्यांची फसवणूक थांबली, अशा अनेक कामगिरी दि. बा. पाटील यांनी केल्या आहेत. पण या विमानतळाला जर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले तर मला जास्त आनंद होईल. कारण मला असे वाटते कि, गेल्या काळात संभाजी महाराजांबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज निर्माण केले गेले आहेत आणि खूप लोकांपर्यत महाराजांची माहिती आजही तितकी पोहोचली गेली नाहीये. तर ह्या विमानतळाच्या निमित्ताने का होईना बऱ्याच लोकांपर्यत महाराजांबद्दल माहिती पोहोचेल अथवा बरेच लोक महाराजांबद्दल माहिती मिळवतील कि विमानतळाला ज्यांचे नाव दिले गेले आहे ही व्यक्ती आहे तरी कोण? आपले महाराज आणि त्यांचे विचार घराघरात पोहोचणे ही काळाची गरज आहे असे मला तरी वाटते."(Navi Mumbai International Airport)
 
 
 
विनायक माळीनेही मांडली भूमिका
 
दरम्यान, या विषयावर आणखी प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि कलाकार विनायक माळी यानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे. दि. बा. पाटील यांनी आगरी-कोळी समाजासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. जमिनींच्या हक्कांसाठी उभ्या केलेल्या लढ्यामुळे स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि आगरी-कोळी समाजाला न्याय मिळाला, असे विनायक माळीने त्यावेळी नमूद केले.(Navi Mumbai International Airport)
 
श्रीमान लेजेंड आणि विनायक माळी हे दोघेही प्रभावशाली डिजिटल कंटेंट क्रिएटर्स असले, तरी दोघांची मते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून येत आहेत. एकीकडे श्रीमान लेजेंड छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास, विचार आणि व्यापक सामाजिक प्रभावावर भर देत आहेत, तर दुसरीकडे विनायक माळी स्थानिक भूमिपुत्र, आगरी-कोळी समाज आणि दि. बा. पाटील यांच्या सामाजिक योगदानाला अग्रक्रम देण्याची भूमिका मांडत आहेत. या दोघांनी मांडलेल्या या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सोशल मीडियावर दोन गट पडले असून नामांतरणाचा हा मुद्दा सामाजिक, ऐतिहासिक आणि वैचारिक पातळीवरही महत्त्वाचा ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.(Navi Mumbai International Airport)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com