Sonu Sood: ऑनलाइन गेमच्या व्यसनाने गाझियाबादमध्ये तीन बहिणींचा मृत्यू, सोनू सूदची भावनिक प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?

Total Views |


 
Sonu Sood
 
ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी येथे बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेत १६ वर्षीय निशिका, १४ वर्षीय प्राची आणि १२ वर्षांची पाखी यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अभिनेता सोनू सूद यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. (Sonu Sood)
 
सोनू सूद काय म्हणाले? (Sonu Sood)
 
सोनू सूद म्हणाले, “आज गाझियाबादमध्ये तीन मुलींनी जीव गमावला. हे मृत्यू गरिबीमुळे किंवा हिंसेमुळे नाहीत, तर ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल व्यसनाच्या अदृश्य दबावामुळे झालेत. मी आधीही सांगितलंय आणि पुन्हा सांगेन, १६ वर्षांखालील मुलांसाठी शिक्षणाव्यतिरिक्त सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगवर कडक निर्बंध असायला हवेत.”
 
नेमकी घटना काय?
 
गाझियाबादमधील शालीमार गार्डन परिसरात ४ फेब्रुवारीच्या पहाटे एक धक्कादायक घटना घडली. भारत सिटी या निवासी संकुलातील एका उंच इमारतीवरून पडल्यामुळे तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांना रात्री सुमारे २.१५ वाजता माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मुलींना १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
मृत मुली अनुक्रमे १६, १४ आणि १२ वर्षांच्या होत्या. प्राथमिक तपासात त्या ऑनलाइन गेम्स आणि कोरियन मनोरंजन संस्कृतीकडे आकर्षित झाल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईल वापरावर निर्बंध आणण्यात आल्याचेही समजत आहे.

पोस्टमॉर्टम अहवालानुसार उंचावरून पडल्यामुळे झालेल्या गंभीर जखमा आणि रक्तस्त्राव ही मृत्यूची कारणं आहेत. नेमकं कारण काय, याबाबत पोलीस अजूनही सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
 
प्राथमिक तपासात मुलींना ऑनलाइन गेम्स, कोरियन संगीत, ड्रामा आणि परदेशी संस्कृतीची मोठी आवड होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी आपली नावेही बदलल्याचं समोर आलं. मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की कोणताही टास्क-आधारित गेम किंवा एखादं अॅप हे एकमेव कारण ठरवणं योग्य ठरणार नाही.
 
उपायुक्त निमिष पाटील यांच्या मते, सुसाइड नोटमध्ये काही आरोप नमूद होते; परंतु पोस्टमॉर्टम अहवालात मारहाणीच्या खुणा आढळलेल्या नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब आर्थिक अडचणीत होतं. कोविडनंतर मोठं नुकसान झालं आणि कर्जाचं ओझं वाढलं. काही वर्षांपूर्वी मुलींचं शिक्षणही थांबल्याचं सांगितलं जात आहे. घरात वाद होत असल्याच्या बाबींचाही तपास सुरू आहे. वडील चेतन कुमार यांनी आर्थिक नुकसान झाल्याची कबुली दिली; मात्र त्याचा आणि मुलींच्या या निर्णयाचा थेट संबंध जोडू नये, असे ते म्हणाले. या घटनेवर अभिनेता सोनू सूद यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगवर कडक निर्बंध असावेत, अशी मागणी केली. मुलांना ‘अल्गोरिदम’पेक्षा पालकांच्या वेळेची आणि मार्गदर्शनाची जास्त गरज आहे, असेही ते म्हणाले. 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com