मुंबई: (Ritu Tawde) मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार रितू राजेश तावडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महापौरपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे आता औपचारिकतेपुरतेच उरले आहे. (Ritu Tawde)
हेही वाचा: Ritu Tawde: भाजपचा ‘मराठी चेहरा’ पुढे; मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे कोण?
भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता. मात्र उबाठा गटाने स्पर्धेत उतरू नये, असा निर्णय घेतल्याने निवडणूक टळणार असल्याचे स्पष्ट झाले. महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने तावडे यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच मजबूत मानली जात होती. (Ritu Tawde)
घाटकोपर पश्चिम येथून सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तावडे या शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा आहेत. संघटनात्मक काम आणि स्थानिक पातळीवरील सक्रियतेमुळे त्यांना पक्षात भक्कम पाठबळ मिळाले आहे. निवड झाल्यास त्या मुंबईतील भाजपच्या पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत. (Ritu Tawde)