मुंबई: (Maharashtra Mayor List 2026) राज्यातील विविध महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीने स्पष्ट वर्चस्व गाजवत सर्वाधिक महापौर पदांवर विजय मिळवला आहे. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या आठ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. (Maharashtra Mayor List 2026)
या निवडणुकांमध्ये सोलापूर, जळगाव आणि अहिल्यानगर येथे अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या लढती अखेर बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि धुळे येथे भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. (Maharashtra Mayor List 2026)
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना (शिंदे गट) आणि एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी वर्णी लागली असून त्या जळगावच्या १७व्या महापौर ठरल्या आहेत. तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट)चे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Maharashtra Mayor List 2026)
नागपूर महापालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी १०४ मते मिळवत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. धुळे महापालिकेत तिरंगी लढत झाली. येथे भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी ५० मते मिळवून महापौरपदावर विजय मिळवला. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संयुक्त उमेदवाराला केवळ १३ मते मिळाली. (Maharashtra Mayor List 2026)
नांदेड महानगरपालिकेत भाजपने इतिहास घडवत पहिल्यांदाच महापौर पदावर आपला उमेदवार विराजमान केला आहे. ८१ पैकी ४५ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून कविता मुळे यांची महापौरपदी निवड झाली आहे. उपमहापौरपदी दिपकसिंह रावत यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. (Maharashtra Mayor List 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.