Rajpal Yadav: चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवला हायकोर्टाचा मोठा धक्का; तात्काळ शरणागतीचे आदेश

Total Views |
 
Rajpal Yadav
 
नवी दिल्ली : (Rajpal Yadav) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता राजपाल यादवच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ५ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात ट्रायल कोर्टाने सुनावलेली शिक्षा रद्द व्हावी आणि शरणागतीच्या आदेशातून दिलासा मिळावा, यासाठी दाखल केलेली त्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी राजपाल यादवला ४ फेब्रुवारी रोजी शरणागती पत्करण्याचे स्पष्ट आदेश दिले. (Rajpal Yadav)
 
सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, राजपाल यादवला याआधीच शरणागतीसाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यावेळी आपण मुंबईत असल्याचे कारण देत त्याने वेळ मागितला होता. मात्र, आता कोणतीही अतिरिक्त सवलत देण्यास ठोस कारण नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. “तुम्हाला आधीच पुरेसा वेळ देण्यात आला आहे. आता नरमी दाखवण्याचं कारण दिसत नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले. (Rajpal Yadav)
 
राजपाल यादवच्या वतीने उपस्थित वकिलांनी युक्तिवाद करत एक आठवड्याची मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांनी दावा केला की, राजपाल यादवने ५० लाख रुपयांची रक्कम उभी केली असून त्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. तसेच ५ फेब्रुवारी रोजी तो संपूर्ण रक्कम घेऊन न्यायालयात हजर राहील, असेही सांगण्यात आले. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत कोणतीही अतिरिक्त मुदत देण्यास नकार दिला. (Rajpal Yadav)
 
हेही वाचा : 'Dhurandar' सिनेमात एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून राहुल गांधी यांचे नाव समोर! सोशल मिडियावर मिम्स व्हायरल, सत्य काय? 
 
या निर्णयानंतर आता राजपाल यादवला जेल प्रशासनासमोर शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. या प्रकरणात पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यानही उच्च न्यायालयाने राजपाल यादवला फटकारले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याचे वर्तन योग्य नसल्याचे नमूद करत, त्याने वारंवार दिलेली आश्वासने पाळली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे ट्रायल कोर्टाने दिलेली शिक्षा त्यांला भोगावीच लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. (Rajpal Yadav)
 
५ कोटी रुपयांचा चेक बाऊन्स...
 
हे प्रकरण ५ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदार ‘मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने आरोप केला आहे की, २०१० साली राजपाल यादवच्या कंपनीला एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. करारानुसार ही रक्कम व्याजासह ८ कोटी रुपये परत करण्याचे ठरले होते. (Rajpal Yadav)
 
मात्र, पैसे परत न करता राजपाल यादवकडून देण्यात आलेले चेक वारंवार बाऊन्स झाले. बचाव पक्षाने हे पैसे कर्ज नसून गुंतवणूक असल्याचा दावा केला होता. तरीही न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य न करता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवले. (Rajpal Yadav)
 
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com