Nashik: नाशिक भाजप शहराध्यक्षांनी आधी राजीनामा दिला आणि नंतर मागे घेतला! नेमकं काय घडलं?

04 Feb 2026 15:59:36

Nashik
 
नाशिक : (Nashik) वरिष्ठांसोबत सविस्तर झालेल्या चर्चेमुळे समाधान झाल्याने भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौरांची निवड जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर काही वेळातच केदार यांनी राजीनामा दिला होता. (Nashik)
 
मात्र बुधवार, दि. ४ जानेवारी रोजी प्रदेश पातळीवरुन सुनील केदार यांची राजीनाम्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती समाधान झाल्यानंतर प्रदेश भाजपकडून राजीनामा मागे घेण्याची केदार यांना केलेल्या सूचनेनुसार त्यांनी राजीनामा मागे घेतला. (Nashik)
 
हेही वाचा :  Adani Defence and Aerospace : स्वदेशी हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महत्वपूर्ण करार
 
वरिष्ठांसोबत सविस्तर चर्चा
 
ज्या कारणांमुळे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर प्रदेश भाजपबरोबर सविस्तरपणे चर्चा झाली असून माझे समाधान झाले. प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार मी माझा राजीनामा मागे घेतला आहे. (Nashik)
- सुनील केदार, अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर जिल्हा
 
 
Powered By Sangraha 9.0