Adani Defence and Aerospace : स्वदेशी हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महत्वपूर्ण करार

अदानी डिफेन्स–लिओनार्डो करार यांच्यात सामंजस्य करार

Total Views |

Adani Defence and Aerospace

नवी दिल्ली : (Adani Defence and Aerospace) अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसने (Adani Defence and Aerospace) मंगळवार,दि.३ फेब्रुवारी रोजी इटलीतील आघाडीची संरक्षण कंपनी लिओनार्डोसोबत भारतात संपूर्णपणे एकात्मिक हेलिकॉप्टर उत्पादन परिसंस्था उभारण्यासाठी सामंजस्य करार केला. नवी दिल्ली येथे झालेल्या या करारावर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि संरक्षण मंत्रालयाचे संपादन महासंचालक ए. अनबरासू यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.(Adani Defence and Aerospace)
 
हा करार अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाला आहे. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दल यांना एकत्रितपणे विविध श्रेणींतील एक हजारांहून अधिक हेलिकॉप्टरची गरज आहे. यामध्ये ३०० हून अधिक लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर, ३०० पेक्षा जास्त मीडियम-लिफ्ट हेलिकॉप्टर, सुमारे १०० इंटरमिजिएट हेलिकॉप्टर आणि ९० पेक्षा अधिक सागरी बहुउद्देशीय हेलिकॉप्टरचा (Adani Defence and Aerospace) समावेश आहे. यात लिओनार्डोची AW169M आणि AW109 TrekkerM ही हेलिकॉप्टर मॉडेल्स असतील. टप्प्याटप्प्याने स्वदेशी निर्मितीचा रोडमॅप आखण्यात आला असून, त्यामध्ये स्थानिक उत्पादन, देखभाल-दुरुस्ती व ओव्हरहॉल सुविधा तसेच वैमानिक प्रशिक्षण व्यवस्था उभारण्याचा समावेश आहे.(Adani Defence and Aerospace)
 
हेही वाचा : Mumbai-Pune Expressway: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर २० तासांपसून भीषण वाहतूक कोंडी; २५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, कोंडीच कारण काय? 
 
हा करार अदानी डिफेन्सच्या (Adani Defence and Aerospace) वाढत्या संरक्षण पोर्टफोलिओचा भाग आहे. इस्रायलच्या एल्बिट सिस्टिम्ससोबतच्या संयुक्त उपक्रमातून हैदराबादमध्ये भारतातील पहिली खासगी ड्रोन उत्पादन सुविधा चालवली जाते. याशिवाय, फ्रान्सच्या थेल्स समूहासोबत ७० मिमी रॉकेट उत्पादन, यूएईच्या ईडीजीइ समूहासोबत क्षेपणास्त्र व इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, पाणबुडीविरोधी सोनाबॉय तंत्रज्ञान आणि उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉरमधील दारुगोळा व क्षेपणास्त्र उत्पादन प्रकल्पांद्वारे आदानी डिफेन्स भारताच्या संरक्षण स्वावलंबनाला बळ देत आहे.(Adani Defence and Aerospace)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.