Jai Pawar: अजित पवारांच्या निधनाला सात दिवस; वडिलांच्या आठवणीत लेक जय पवार भावूक, सोशल मीडियावर पोस्ट केले काही खास फोटो...

Total Views |
 
Jai Pawar
 
मुंबई : (Jai Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. गेल्या बुधवारी, २८ जानेवारी रोजी अजित पवार हे सभांसाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर त्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर स्फोट होऊन आग लागली आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सुमारे ८.४५ वाजता घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकीय व सामाजिक जीवनावर गहिरा आघात केला. तो दिवस महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. (Jai Pawar)
 
अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा आघात अत्यंत वेदनादायी होता. गुरुवारी, २९ जानेवारी रोजी बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडत वडिलांना अखेरचा निरोप दिला. त्या वेळी उपस्थित हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि नेते भावूक झाले होते. (Jai Pawar)
 
हेही वाचा : Sunetra Pawar: मोठी बातमी! पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच 
Jai Pawar
 
अजित पवारांच्या निधनानंतर काही दिवसांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या वेळी त्यांचा धाकटा मुलगा जय पवार सावलीसारखा त्यांच्यासोबत होता, तर मोठा मुलगा पार्थ पवार बारामतीमध्येच थांबून सांत्वनासाठी येणाऱ्या नागरिकांना भेटत होता. पवार कुटुंबीयांनी या कठीण काळात संयम आणि धैर्य दाखवलं. (Jai Pawar)
 
दरम्यान, मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या निधनाला सात दिवस पूर्ण झाले आहेत. या सात दिवसांतही राज्यातील जनतेच्या डोळ्यांतून अश्रू थांबलेले नाहीत. त्यांच्या बहिणी सुप्रिया सुळे या सतत अजित पवार यांच्या आठवणी जागवणारे फोटो आणि स्टेटस सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. कालही त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला होता, ज्याची मोठी चर्चा झाली. (Jai Pawar)
 
Jai Pawar 
 
वडिलांच्या आठवणीत लेक जय पवार भावूक (Jai Pawar)
 
अजित पवार यांच्या जाण्यानंतर पार्थ आणि जय पवार हे दोन्ही पुत्र धीराने परिस्थितीचा सामना करताना दिसत आहेत. मात्र आता धाकटा मुलगा जय पवार वडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. जय पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अजित पवारांसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. (Jai Pawar)
 
एका फोटोमध्ये अजित पवार आणि जय पवार गॉगल लावून एकत्र पोझ देताना दिसतात. या फोटोसोबत जय यांनी “Missing you a lot Dad” अशे छोटे पण हृदयाला भिडणारी कॅप्शन लिहिले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये जय पवार वडिलांना घट्ट मिठी मारताना दिसतात आणि अजित पवार हसतमुखाने उभे आहेत. या फोटोसोबत जय यांनी लिहिलेले कॅप्शन अनेकांना भावूक करून गेले, “Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो.” (Jai Pawar)
 
या दोन फोटोमधून वडील–मुलाचं अतूट, जिव्हाळ्याचं नातं स्पष्टपणे दिसून येत आहे. अजित पवार यांची उणीव त्यांच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला तीव्रतेने जाणवत आहे. (Jai Pawar)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com