Mumbai Transport plan: मुंबईच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी 'एआय प्लॅन'; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

28 Feb 2026 17:10:02
 
Mumbai Transport plan
 
मुंबई : (Mumbai Transport plan) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी 'एआय प्लॅन' तयार करण्यात येत असून लवकरच यासंदर्भात बैठक घेण्यात असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. (Mumbai Transport plan)
 
आ. मुरजी पटेल यांनी शनिवारी औचित्याच्या मुद्यामार्फत अधेरी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे सरकारचे लक्ष वेधले. तसेच आ. अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक रस्त्यांवर प्रवेश नसलेल्या मार्गावर उलट दिशेने गाड्या चालवल्या जात असल्यामुळे अपघातात वाढ होते असून यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार केली. तर, आ. वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील बिकेसी, कला नगर, कुर्ला ते सांताक्रुझ जोड मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि आ. दिलीप लांडे यांनी चांदिवली परिसरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. (Mumbai Transport plan)
 
हेही वाचा: Ayushman Bharat: 'एमएमआर' प्रदेशात 'आयुष्यमान भारत'चा लाभ देण्यास रुग्णालयांचा नकार 
 
यावर उत्तर देताना मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली असून याबाबत वाहतूक विभागाच्या सहपोलिस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईचा वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच मुंबईतील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या भंगार गाडयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असून मुंबई महापालिका याबाबत कार्यवाही करीत आहे. मुंबईतील आमदारांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन याबबात लवकरच बैठक घेण्यात येईल," असे त्यांनी सांगितले. (Mumbai Transport plan)
 
 
Powered By Sangraha 9.0