मुंबई: (Ayushman Bharat) नामांकित रुग्णालयांकडून 'आयुष्यमान भारत' योजनेचा लाभ देण्यास नकार दिला जात असल्याने 'एमएमआर' प्रदेशात या योजनेचा काहीही उपयोग होत नाही, असा आरोप विविध पक्षांच्या आमदारांकडून शनिवारी विधानसभेत करण्यात आला. (Ayushman Bharat)
भाजप आमदार शंकर जगताप यांनी राज्यातील रुग्णालये आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार नाकारत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर, संजय केळकर, मनिषा चौधरी, वरुण सरदेसाई, हेमंत ओगले यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी "मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयुष्यमान भारत योजनेतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतात. या योजनेतील रुग्णांना तिथे प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे या योजनेचा मुंबई एमएमआर रिजनमध्ये काहीही उपयोग होत नाही," असा आरोप करण्यात आला. (Ayushman Bharat)
यावर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उत्तरात हस्तक्षेप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला नेमकी अडचण काय आहे, असा सवाल केला. त्यानंतर दरपत्रक जाहीर करण्याची मुख्य मागणी असून मंत्री मुळ प्रश्नाला बगल देत असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला. ते म्हणाले की, "आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रचार प्रसारावर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. मात्र, मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये या योजनेचा फायदा रुग्णांना होत नाही. अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या योजनेंतर्गत समावेशाला नकार देतात. या योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. त्यामुळे आहे त्या सरकारी उपचारांच्या दरावर अधिक रुग्णालयाची नोंदणी करणार का? आणि मुंबई एमएमआर रिजनमध्ये वेगळे दरपत्रक लागू केले जाईल का?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. (Ayushman Bharat)
आमदार संजय केळकर म्हणाले की, "आम्ही मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले. परंतू, कार्ड घेऊन गेलेल्या रुग्णांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही कार्ड देणेच बंद केले आहे. नोंदणी असलेल्या हॉस्पिटलमध्येही अशा कार्डधारक रुग्णांना उभे केले जात नाही. त्यामुळे एमएमआर रिजनमध्ये दरपत्रक बदलल्याशिवाय चांगले हॉस्पिटल या योजनेत समाविष्ट होणार नाही. दरपत्रक बदलण्याबद्दल सरकार काय विचार करत आहे? त्यानंतर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एमएमआर रिजनमधील नामांकित हॉस्पिटलचा योजनेत समावेश करण्यासाठी या महिन्याच्या आत बैठक घेऊ," असे आश्वासन दिले. (Ayushman Bharat)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....