Rohit Pawar: मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवारांचा ठिय्या इशारा! डीजीसीए विरोधात तक्रारीवरून पोलिसांशी...

25 Feb 2026 16:34:27


 
Rohit Pawar
 
मुंबई : (Rohit Pawar) शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे आमदार रोहित पवार यांनी आज दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात जाऊन डीजीसीए विरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, तक्रार नोंदवण्यावरून पोलिसांशी त्यांची जोरदार वादावादी झाल्याची माहिती माध्यमांवरून समोर आली आहे. (Rohit Pawar)
 
रोहित पवार यांनी स्पष्ट इशारा दिला की, “मरीन ड्राइव्हमध्ये एफआयआर नोंदवला नाही, तर बारामतीमध्ये नोंदवू. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडू.” एफआयआर नोंदवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. (Rohit Pawar)
 
हेही वाचा:  Ajit Pawar Plane Crash : डीजीसीएची मोठी कारवाई! व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणावर घातली बंदी

 
पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
 
रोहित पवार यांच्या मते, ते देशाचे नागरिक म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील उपस्थित होते. सुरुवातीला एका ज्युनिअर अधिकाऱ्याने एफआयआर होऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले वकील प्रांजल यांनी कायद्याचे मुद्दे मांडत एफआयआर नोंदवता येऊ शकतो, असे समजावून सांगितले. (Rohit Pawar)
 
तक्रार नोंदवण्यासाठी लॅपटॉपही आणण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने येऊन “एफआयआर होणार नाही, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा,” असे सांगितल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. (Rohit Pawar)
 
एफआयआर प्रक्रिया सुरू करून ती नंतर थांबवण्यात आल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केला की, “वरून कोणाचा फोन आला? एफआयआर नोंदवायला घेतली मग का रद्द केली?” या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, अजित पवार विमान अपघात प्रकरणी पुढील घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Rohit Pawar)





Powered By Sangraha 9.0