भक्ती, समर्पण आणि राष्ट्रीय भावनेला समर्पित 'श्रीरामार्चनम्'

23 Feb 2026 15:05:45
RSS Organises ‘Shriramararchanam’ March in Ayodhya
 
मुंबई : (RSS Organises ‘Shriramararchanam’ March in Ayodhya) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिल्ली प्रांत द्वारा अयोध्येत विशेष कार्यक्रम 'श्रीरामार्चनम्' आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम प्रभु श्रीरामांविषयी श्रद्धा, समर्पण आणि राष्ट्रभावनेला अर्पित करण्यात आला. याप्रसंगी १०८ स्वयंसेवक पूर्ण गणवेशात शरयू तटावरून पथसंचलन करत प्रभू श्रीरामांच्या अर्चनेसाठी निघाले. वीणा चौकात पोहोचल्यावर कारसेवक आणि स्वरसम्राज्ञी लतादीदींना स्वरांजली अर्पण करण्यात आली. तेथून पुढे संचलन करत घोष दल हनुमानगढी येथे पोहोचले आणि पवनपुत्र हनुमानांचे अभिवादन केले.
 
त्यानंतर रामपथावर सुमारे १० मिनिटे थांबून स्थिरवादन करण्यात आले. शेवटी श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर “श्रीरामार्चनम्” सादर करण्यात आले. संपूर्ण संचलनादरम्यान घोष पथक जिथून गेले, तिथे लोक एकसुरात वादन करणाऱ्या घोष दलाकडे टक लावून पाहत होते.
 
हेही वाचा : Divyang Sahayak Portal Inauguration : दिव्यांगांच्या सेवांना डिजिटल गती देणाऱ्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे उद्घाटन
 
घोष वादकांनी भारतीय सांगीतिक परंपरेची गरिमा जिवंत केली. सर्व घोष रचना विविध भारतीय शास्त्रीय राग आणि निश्चित तालांवर आधारित होत्या. कार्यक्रमाच्या सादरीकरणात शास्त्रीयता आणि अनुशासन यांचा सुंदर समन्वय दिसून आला. रागांची मधुरता आणि तालाची संतुलित गती यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि राष्ट्रभावनेने ओतप्रोत झाले.
 
'श्रीरामार्चनम्'चा उद्देश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत भारतीय परंपरा, अनुशासन, सांस्कृतिक गौरव आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचवणे हा होता. अनेक महिन्यांच्या सरावातून प्रशिक्षित वादकांनी आपल्या वाद्यांमधून सातत्याने नियंत्रित आणि सुसंवादी ध्वनी निर्माण केले. शेवटी घोष दलाने राम मंदिर परिसरातील ग्रीन हाऊस मैदानासमोर रामललांसमोर “श्रीरामार्चनम्” सादर केले.
 
 
Powered By Sangraha 9.0