मुंबई : (Divyang Sahayak Portal Inauguration) दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे उपस्थित होते.(Divyang Sahayak Portal Inauguration)
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या एकात्मिक ऑनलाइन पोर्टलमुळे दिव्यांगांच्या सेवा वितरण प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि वेळबद्धता येणार आहे.(Divyang Sahayak Portal Inauguration)
दिव्यांग कल्याण विभागाने विकसित केलेल्या या पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज सादर करण्याची सुविधा, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच अर्जाच्या स्थितीबाबत तपशील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागण्याची आवश्यकता कमी होणार असल्याचे सांगण्यात आले.(Divyang Sahayak Portal Inauguration)
कार्यक्रमात दिव्यांग सहाय्यक पोर्टल https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in� तसेच त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या शासकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे.(Divyang Sahayak Portal Inauguration)
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमामुळे दिव्यांग कल्याण विभागाच्या सेवा वितरण प्रक्रियेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि सेवा एका डिजिटल मंचावर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.(Divyang Sahayak Portal Inauguration)