नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये कर्करोगमुक्त योद्ध्यांचा सन्मान, वेळीच निदान आणि योग्य उपचारांनी कर्करोगावर विजय शक्य असल्याचा दिला संदेश

23 Feb 2026 15:24:35
Nanavati Max Hospital
 
मुंबई : (Nanavati Max Hospital) नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअर'तर्फे नुकतेच एका विशेष प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘कर्करोग हा केवळ एक स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नव्हे’ या कार्यक्रमात १०० हून अधिक कर्करोगमुक्त व्यक्ती, त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी कर्करोग प्रतिबंध, नियमित तपासणी आणि आजाराचे वेळीच निदान होण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक श्री. राजकुमार हिरानी यांची उपस्थिती विशेष ठरली. त्यांनी कर्करोगमुक्त व्यक्तींशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.
 
'सर्व्हायव्हर्स डायरीज' हे सत्र या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. ज्यामध्ये कर्करोग योद्ध्यांनी त्यांचा उपचार आणि आजारातून सावरण्याचा वैयक्तिक प्रवास उपस्थितांसमोर मांडला. प्रसिद्ध संगीतकार श्री. जगदीश लालवानी यांच्या बहारदार सांगीतिक कार्यक्रमाने या सोहळ्यात अधिक रंग भरले आणि उपस्थितांमध्ये नवा उत्साह व ऊर्जा निर्माण केली.
 
यावेळी श्री. हिरानी यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील गौरवशाली प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या शैलीदार आणि खुसखुशीत गप्पांमुळे कार्यक्रमात हलके-फुलके वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे ही संध्याकाळ अधिकच उत्साही आणि संस्मरणीय ठरली.
 
हेही वाचा : Maharashtra Vidhan Parishad 2026 Live:‘माझे शेणाचे हात पेनाला लावणारे अजितदादा’; अमोल मिटकरींच्या शब्दांनी सभागृह भावुक
 
कार्यक्रमाबद्दल बोलताना नानावटी मॅक्स हॉस्पिटलमधील 'एचपीबी आणि जीआय सर्जरी'चे व्हाईस प्रेसिडेंट तसेच 'ऑन्कोलॉजी ग्रोथ अँड स्ट्रॅटेजी'चे लीड डॉ. गणेश नगरराजन म्हणाले की, "प्रत्येक कर्करोगमुक्त व्यक्तीची गोष्ट आपल्याला आठवण करून देते की, कर्करोगाशी लढा देऊन त्यावर मात करता येते. जेव्हा हे योद्धे आपल्याशी बोलतात, तेव्हा ते केवळ प्रेरणाच देत नाहीत, तर प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर तपासणी आणि योग्य वेळी उपचार घेण्याचे महत्त्वही समाजाला पटवून देतात. कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांमध्ये आशेचा हा संदेश पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही श्री. हिरानी यांचे मनापासून आभार मानतो."
 
युरोलॉजिक आणि गायनॅकॉलॉजिक ऑन्कोसर्जरी विभागाचे हेड आणि प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. हेमंत टोणगावकर म्हणाले की, "कर्करोगाशी संबंधित सामाजिक गैरसमज किंवा भीती, कलंक दूर करण्यासाठी असे मेळावे अत्यंत आवश्यक आहेत. हा कार्यक्रम हे सिद्ध करतो की, जर कर्करोगाचे निदान वेळीच झाले आणि सुरुवातीच्या टप्प्यात उपचार मिळाले, तर तो इतर कोणत्याही आजाराप्रमाणे व्यवस्थित बरा होऊ शकतो. आज आपले 'कॅन्सर वॉरियर्स' जेव्हा त्यांचा प्रवासाचा अनुभव सांगतात, तेव्हा जगाला हा विश्वास मिळतो की उपचार शक्य आहेत आणि आजारानंतरही आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येऊ शकते."
 
हे वाचलत का? - Divyang Sahayak Portal Inauguration : दिव्यांगांच्या सेवांना डिजिटल गती देणाऱ्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे उद्घाटन
 
मुंबईतील ५४ वर्षीय फायनान्शिअल अनालिस्ट आणि कर्करोगमुक्त योद्धा श्री. सुनील रॉड्रिग्स, ज्यांनी दोन वर्षांपूर्वी नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि ते यशस्वी झाले. श्री रॉड्रिग्स यांनी सांगितले की, कर्करोगाला हरवण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपल्या डॉक्टरांवरील अढळ विश्वास. उपचारादरम्यान मी नेहमी डॉक्टरांच्या प्रत्येक सल्ल्याचे काटेकोरपणे पालन केले. जर तुमच्या पाठीशी अनुभवी डॉक्टरांची टीम असेल, तर कर्करोगावर मात करणे शक्य आहे; तुम्हाला फक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे.”
 
नानावटी मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअरमध्ये भारतातील तज्ञांची एक सर्वात मोठी 'मल्टी-स्पेशालिटी' टीम उपलब्ध आहे. जगभरातील कर्करोग रुग्णांना प्रगत तंत्रज्ञानाद्वारे पुराव्यांवर आधारित आणि वैयक्तिकृत उपचार याठिकाणी दिले जातात. या केंद्रात 'डा विंची एक्सआय' रोबोटिक सर्जिकल सिस्टमद्वारे संचलित रोबोटिक ऑन्कोलॉजी, 'हायपरआर्क'सह 'एज' प्रणालीद्वारे केली जाणारी हाय-प्रिसिजन रेडिओसर्जरी आणि स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी यांसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. याशिवाय, केमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीसोबतच येथे इम्युनो-ऑन्कोलॉजिकल उपचारही दिले जातात.
 
 
Powered By Sangraha 9.0