मुंबई : (Eknath Shinde) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवार, दि. २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार असून, ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (Eknath Shinde)
वित्त खात्याची जबाबदारी यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. मात्र मागील महिन्यात बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस सादर करणार आहेत. (Eknath Shinde)
हेही वाचा: काँग्रेसचे नग्न वास्तव
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात त्यांच्या अखत्यारीतील काही खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. (Eknath Shinde)
सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार मंत्री दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे. नगरविकास विभागाची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली असून गृहनिर्माण विभाग शंभूराज देसाई सांभाळणार आहेत. (Eknath Shinde)