Mumbai Climate Week 2026: पर्यावरण रक्षणासोबत कृषी क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन

Total Views |
 
Mumbai Climate Week 2026
 
मुंबई : (Mumbai Climate Week 2026) जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई क्लायमेट वीक २०२६ चा समारोप सोहळा गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. शहरी टिकाऊपणा आणि ग्लोबल साऊथसाठी हवामान कृती या मुख्य विषयांवर केंद्रित असलेल्या या तीन दिवसीय परिषदेला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. (Mumbai Climate Week 2026)
 
कृषी क्षेत्राकडेही लक्ष देण्याचे राज्यपालांचे आवाहन
 
समारोपप्रसंगी बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पर्यावरण तज्ज्ञांनी हवामान बदलाचा विचार करताना कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेकडेही लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. कृषी क्षेत्रातील रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असून, युरिया, डीएपी आणि कीटकनाशकांमुळे ‘नायट्रस ऑक्साईड’सारख्या वायूंचे उत्सर्जन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. (Mumbai Climate Week 2026)
 
या रसायनांचा अंश भूजल आणि अन्नसाखळीत मिसळून गंभीर आजारांचे संकट निर्माण होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कार्बन आणि भूजलसाठा वाढतो, असे नमूद करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्रीय प्राकृतिक कृषि मिशन’चा उल्लेख केला. (Mumbai Climate Week 2026)
 
हेही वाचा: Mumbai Climate Week 2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत ‘मुंबई क्लाइमेट वीक २०२६’चा दिमाखदार समारोप  
 
“पर्यावरण संरक्षणासाठी ठोस कृतीची गरज” - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
 
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक आणि ठोस कृती करण्याची गरज अधोरेखित केली. भूतकाळात विकास आणि पायाभूत सुविधांवर भर देताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्याने आज जगाला त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Mumbai Climate Week 2026)
 
माती, पाणी आणि हवा या पर्यावरणाच्या मूलभूत घटकांवर औद्योगिकीकरण आणि वाढत्या शहरीकरणामुळे ताण निर्माण झाला आहे. पर्यावरण विषयक परिषदांतील चर्चा केवळ बौद्धिक पातळीवर न राहता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Mumbai Climate Week 2026)
 
 
"हवामान लवचिकतेसाठी सार्वत्रिक प्रयत्न आवश्यक" - महापौर रितू तावडे
 
महापौर रितू तावडे यांनी शहर विकास आणि हवामान जबाबदारी या समांतरपणे पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. हवामान लवचिकता साध्य करण्यासाठी शासन, खाजगी क्षेत्र, वित्तीय संस्था, संशोधन संस्था आणि नागरिक यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (Mumbai Climate Week 2026)
 
मजबूत सार्वजनिक-खाजगी भागीदारी, नवोन्मेषी वित्तपुरवठा, तांत्रिक सहकार्य आणि नागरिकांच्या वर्तनातील सकारात्मक बदल यावर भर देत त्यांनी हवामान कृतीसाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. (Mumbai Climate Week 2026)
 
तीन दिवस चाललेल्या या परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञांनी हवामान बदलाच्या गंभीर प्रश्नावर चिंतन करत विविध उपाययोजनांवर चर्चा केली. आयोजकांनी या परिषदेमुळे जागतिक पातळीवरील संवाद आणि सहकार्याला चालना मिळाल्याचे सांगितले. (Mumbai Climate Week 2026)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com