मुंबई : (Kerala youngest organ donor) केरळमधील मल्लापल्ली येथील अलिन शेरीन अब्राहम ही केरळमधील सर्वात तरुण अवयवदाता ठरली असून तिच्या अवयवांमुळे एका बालकासह पाच जणांना नवजीवन मिळणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता कोट्टायमहून तिरुवल्लाकडे एमसी रोडने जात असताना अलिन प्रवास करत असलेल्या वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने धडक दिली. या भीषण अपघातात अलिन गंभीर जखमी झाली. (Kerala youngest organ donor)
प्राथमिक उपचारांनंतर तिला पुढील उपचारासाठी केरळमधील अमृता रुग्णालय येथे हलवण्यात आले. मात्र १३ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. या अत्यंत कठीण क्षणी तिचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरीन यांनी मोठा निर्णय घेत तिचे अवयव दान करण्यास संमती दिली. केरळमधील सर्वात तरुण अवयवदाता असलेल्या दहा महिन्यांच्या अलिन शेरीन अब्राहमचा पथनमथिट्टा येथे राज्यस्तरीय निरोप समारंभ पार पडला. (Kerala youngest organ donor)
अलिनचे यकृत किम्स रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला दिले जाणार आहे. मरणोत्तर अवयवदानातून यकृत मिळणारा तो राज्यातील सर्वात लहान रुग्ण ठरणार आहे. दोन्ही मूत्रपिंडे एसएटी हॉस्पिटलमधील बालरुग्णाला दिली जाणार आहेत. हृदय श्री चित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट येथे दिली जाणार आहे, तर डोळे अमृता रुग्णालयातच एखाद्या रुग्णावर वापरण्यात येतील. (Kerala youngest organ donor)
कोचीहून तिरुवनंतपुरमपर्यंतचा प्रवास रुग्णवाहिकेने अवघ्या ३ तास १५ मिनिटांत पूर्ण केला. पोलिस आणि नागरिकांनी ग्रीन कॉरिडॉर तयार करून मार्ग मोकळा केला. या संपूर्ण प्रक्रियेचे समन्वयन के-सोट्टोने गृह विभागाच्या मदतीने केले. (Kerala youngest organ donor)
Ten-month-old Aalin Sherin Abraham, the youngest organ donor in Kerala, was given a state-level farewell in Pathanamthitta after her tragic death in a road accident earlier this month.
Aalin suffered critical injuries when the car she was in collided with another vehicle in… pic.twitter.com/vIxfX68J0P
दरम्यान, केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दुःखाच्या क्षणी घेतलेल्या या मानवतावादी निर्णयाबद्दल पालकांचे आभार मानले आणि कुटुंबाच्या वेदनेत आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. (Kerala youngest organ donor)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.