अजित पवार यांच्या मृत्यूवर संशय; रोहित पवार खासगी तपासाच्या तयारीत? सविस्तर जाणून घ्या...

Total Views |
 
rohit pawar demand private investigation
 
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. २८ जानेवारी रोजी ते मुंबईहून बारामतीकडे येत असताना, बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील आणखी चौघांचा मृत्यू झाला. बारामतीसह राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. (rohit pawar demand private investigation)
 
मात्र, या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर अपघाताबाबत विविध शंका उपस्थित होऊ लागल्या. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते रोहित पवार यांनी या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी सातत्याने मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांचा अपघात की घातपात असा थेट प्रश्न उपस्थित केला. तसेच अजित पवार गटातील काही नेत्यांनीही या मुद्याला दुजोरा दिला. गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यानंतर आता ते दिल्ली दौऱ्यावर असताना, त्यांची दोन खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रतिनिधींशी भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असू शकतो अशी शक्यता वर्तवली असून, सरकारी तपास यंत्रणांवर म्हणजेच (DGCA) वर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे, रोहित पवार यांचा शासकिय तपासावर विश्वास नाही का? (rohit pawar demand private investigation)
 
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राजकारणात आणि राज्यभरात संशयाचे सावट अधिक गडद होत चालले आहे. मात्र या प्रकरणावर सर्वात आक्रमक भूमिका घेतली आहे ती अजित पवार यांचे पुतने रोहित पवार यांनी. दादांच्या मृत्यूला अपघात मानण्यास ते सुरुवातीपासून तयार नाहीत; उलट हा घातपात असू शकतो, अशी शक्यता ते सातत्याने व्यक्त करत आहेत. (rohit pawar demand private investigation)
 
गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रम मांडला, अनेक प्रश्न उपस्थित केले आणि सरकारी तपास यंत्रणांच्या कामकाजावर थेट बोट ठेवले. त्यांच्या मते, या प्रकरणातील अनेक बाबी अजूनही धूसर आहेत. हवामान प्रतिकूल असताना टेकऑफ आणि लँडिंगला परवानगी का देण्यात आली? हँडलरने ‘ओके’ कशाच्या आधारावर दिलं? कंपनीच्या अंतर्गत संवादांची, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सची, उड्डाणापूर्वीच्या निर्णय प्रक्रियेची चौकशी का होत नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. त्यासोबतच, त्यांनी मुख्य वैमानिक कपूर यांच्या संदर्भातही गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या मानसिक स्थितीबाबत, आर्थिक ताणाबाबत किंवा कोणत्याही प्रकारच्या दबावाबाबत चौकशी झाली का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. चॅट्स डिलीट झाल्या असल्या तरी त्या परत मिळवता येतात, मग त्या तपासात का आणल्या जात नाहीत, असा त्यांचा युक्तिवाद आहे. संबंधित कंपनीच्या कार्यपद्धतीची, सुरक्षा नियमांची आणि फ्लाइट क्लिअरन्स देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी ही त्यांनी केली. (rohit pawar demand private investigation)
 
आता याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक मोठं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी काही खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या संस्थांना अपघाताशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली असून, त्यापैकी एका संस्थेला स्वतंत्र तपासाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सरकारी तपासाला विलंब होत असल्याचा आरोप करत पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली असल्याचं म्हटलं जात आहे. (rohit pawar demand private investigation)
 
दरम्यान, रोहित पवार यांनी सोशल मीडियावरही आपली भूमिका अधिक ठाम केली असून, त्यांनी म्हटलं की, स्व. दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्याप झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी! (rohit pawar demand private investigation)
 
आता या सर्व घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे रोहित पवार यांचा सरकारी यंत्रणांवरील अविश्वास. त्यामुळेच ते स्वतंत्र तपासाच्या पर्यायाकडे वळताना दिसत आहेत. मात्र खासगी तपास किती परिणामकारक ठरेल? सरकारी यंत्रणा त्याला कशी प्रतिसाद देईल? हे सर्वच लक्षवेधी ठरणार आहे. (rohit pawar demand private investigation)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com