मुंबई: (Mumbai Metro Pillar Collapse) बांधकामाधीन मुंबई मेट्रो लाइन ४ प्रकल्पांतर्गत मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील पियर क्रमांक १९६ परिसरात पॅरापेटचा काही भाग कोसळल्याच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. (Mumbai Metro Pillar Collapse)
एमएमआरडीएचे संचालक (मेट्रो पीआययू) बसवराज एम. भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखालील ही समितीने दुर्घटनेचे नेमके कारण, जबाबदाऱ्या आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांचा सविस्तर अहवाल सादर करणार आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक उपाय अधिक कडक करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Mumbai Metro Pillar Collapse)
या दुर्दैवी घटनेबद्दल एमएमआरडीएने तीव्र खेद व्यक्त केला असून, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत. प्राधिकरणाच्या भरपाई धोरणानुसार मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाईल, तर जखमींवर होणारा सर्व वैद्यकीय खर्च प्राधिकरणाकडून पूर्णपणे उचलण्यात येणार आहे. (Mumbai Metro Pillar Collapse)