Nirmala Nawale: लाखो फॉलोअर्स… तरी निर्मला नवले पराभूत! प्रस्थापित चेहरा असूनही मतदारांच्या नकारचं कारण काय?

Total Views |


 
Nirmala Navle
 
I want it म्हणजे I want it या वाक्यामुळे एकेकाळी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झालेल्या, पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या निर्मला नवले, कदाचित तुम्हाला माहिती असतीलच. मात्र इंस्टाग्रामवर ५ लाख ८०हजार फालोवर्स असलेल्या निर्मला शुभम नवले यांना यांदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. (Nirmala Nawale)
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवले यांना माजी पंचायत समिती सदस्या मनीषा पाचंगे यांनी ३२९ मतांच्या फरकाने पराभूत केले. पण हा असा प्रसंग काही महाराष्ट्रासाठी नवा नाही. यापूर्वी महापालिका निवडणुकींमध्येही काहीस असचं चित्र पाहायला मिळालं होतं. लाखो सोशल मिडिया फोलोवर्स असलेल्या राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटील आणि उबाठाचे वसंत मोरे यांनाही प्रत्यक्ष निवडणूकीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्राला जरी याची सवय असली तरी, आता या , पराभवानंतर नवले यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकत, भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या समर्थकांचे आभार मानले. पण निर्मला नवले नेमक्या कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? अजितदादाच्या निधनानंतरही त्यांना सहानुभूती का मिळाली नाही? प्रस्थापित चेहरा मतदारांना का नको, आणि त्यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात... (Nirmala Nawale)
 
निर्मला नवले या केवळ शिरूरपुरत्या मर्यादित नसून त्यांच्या व्हिडिओंमुळे राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सोशल मीडियात कायम चर्चेत राहणाऱ्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव झालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना कारेगाव-कान्हूर-मेसाई गणातून तिकीट मिळालं होतं. त्याआधी त्या कारेगावच्या सरपंचही राहिल्यायत. पण, त्यांच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियात निर्मला नवलेंची मोठी क्रेझ आहे. मोठ्या संख्येनं लोक त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. मात्र सोशल मीडियावरची प्रसिद्धी आणि लोकप्रियता, त्या मतांमध्ये रुपांतरीत करु शकल्या नाहीत. त्यांच्या विरोधात मुख्य लढत भाजपच्या माजी पंचायत समिती सदस्या मनिष पाचंगे यांच्याशी होती. पाचंगेंनी निर्मला नवलेंना ३२९ मतांनी पराभूत केलं. हा पराभव नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही एक धक्का म्हणावा लागेल. सुमारे पाच लाख फॉलोअर्सचा पाठिंबा असतानाही निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. (Nirmala Nawale)
 
निर्मला नवले या मूळ पुण्यातल्या शिरुर तालुक्यातल्या आहेत. काही वर्षापूर्वी त्यांचं मूळ गाव कारेगावच्या सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत गेला. राजकारणात पाऊल ठेवूनही त्या सोशल मीडियात कायम सक्रिय राहिल्या. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोवर्स प्रचंड असल्याने त्यांच्या पोस्टवर हजारो लाईक्स येतात. सध्या उच्चशिक्षित तरुण राजकारणाकडे वळत नाहीत. मात्र आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले गावच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना आणखीच प्रसिद्धी मिळाली. उच्चशिक्षित तरुण चेहरा म्हणून त्यांचं नाव चर्चेत आल्यानं अल्पकाळातच त्यांचे सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स बनले. मात्र गावातल्या राजकारणात यश मिळालं असलं तरी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. (Nirmala Nawale)

अजित पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात एकूणच चांगले निकाल मिळाले, पण कारेगाव-कान्हूर-मेसाई गणात स्थानिक मुद्दे आणि भाजपची मजबूत संघटना निर्णायक ठरली. सोशल मीडिया फॉलोअर्स लाखोंनी असले तरी निवडणूक मैदानात करिश्मा घडला नाही; मतदारांना रिल्सऐवजी विकासकामे आणि पक्षीय निष्ठा जास्त महत्त्वाच्या वाटल्या. शिवाय सोशल मीडियावरील लोकप्रियता प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचली नाही. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून अजितदादांच्या निधनाची भावनिक लाट नवले यांना अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरली नाही. आता या पराभवानंतर नवले यांनी इंस्टाग्रामवर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या समर्थकांचे आभार मानले आहेत. नवले यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, की, माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. आपण सर्वांनी तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने जे अथक परिश्रम घेतले, रात्र-दिवस एक करून जे कष्ट उपसले— त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे. हा ३२९ मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आहे… आणि वेदनादायकही तो मी मान्य करते. पण या पराभवापेक्षा तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे. तुमच्या या साथीनं मला पुन्हा उभं राहण्याची, नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे. ही लढाई इथे थांबत नाही… तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे. निर्मला नवले यांच्या या शब्दांमधून पराभवाचं दुःख नक्कीच दिसतं, पण त्याचबरोबर पुन्हा उभं राहण्याची जिद्दही स्पष्ट जाणवते. निवडणुकीचा निकाल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागला नसला, तरी समर्थकांनी दिलेल्या साथीतून त्या नव्याने लढण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. 
(Nirmala Nawale)

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com