न्यायव्यवस्थेवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही; हायकोर्टाचे आक्षेपार्ह पुस्तकावर निर्देश!

09 Jan 2026 13:06:17
Madras High Court
 
मुंबई : ( Madras High Court ) मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू पोलिसांना न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात अपमानास्पद टिपण्णी करणाऱ्या पुस्तकाच्या प्रती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. अशाप्रकारचे कोणतीही गोष्ट प्रसिद्ध होऊ नये याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सध्या न्यायालयाने प्रकाशकांविरुद्ध स्वतःहून (सुओ मोटो) फौजदारी अवमान कारवाईही सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.
 
मुख्य न्यायमूर्ती मनींद्र मोहन श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील मद्रास उच्च न्यायालयाच्या पहिल्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, “आम्ही प्रकाशकांविरुद्ध स्वतःहून फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्यास इच्छुक आहोत. कीळैकाट्रु पब्लिशर्सना तातडीची नोटीस बजावण्यात यावी, तसेच चेन्नई बुक फेअर, नंदनम येथील स्टॉलवर खासगी नोटीस दिली जावी.”
 
हेही वाचा : BMC Election : मनपा निवडणुकीसाठी शिंदेंच्या उमेदवारचा थेट मातोश्रीबाहेर प्रचार
 
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले पोस्टर पाहिल्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले की, सदर दस्तऐवज पाहताच स्पष्ट होते की त्यातील चित्ररूप सादरीकरण, व्यंगचित्रे आणि वापरलेली शब्दावली केवळ अत्यंत अपमानास्पदच नव्हे तर थेट शिवीगाळ करणारी आहे. त्या चित्ररूप सादरीकरणातून या न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींचा चेहरा आणि नाव थेट दाखवले आहे. जर हे पुस्तक याच शीर्षकासह प्रसिद्ध झाले, तर ते स्पष्टपणे अपमानास्पद, शिवीगाळ करणारे आणि अत्यंत अवमानकारक आहे, कारण त्यामुळे न्यायालयाची बदनामी होते आणि जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे न्यायालयाने यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0