मुंबई : ( Chitra Wagh ) "मुंबईतील पागडी इमारतीत मराठी माणूस पिढ्यान् पिढ्या अडकून पडला. त्या मोडक्या इमारती कोसळल्या आणि कित्येक मराठी माणसांचे संसार सुद्धा कोसळले. मराठी माणूस म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरे यांनी इथल्या मराठी माणसासाठी नेमकं काय केलं." असा प्रश्न भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी शुक्रवार दि.९ रोजी ठाकरेना विचारला.
"१३००० इमारती जीवघेण्या झाल्या.२८००० खटले वर्षानुवर्षे लटकले.२५ वर्षे सत्ता होती पण यांना इथल्या मराठी माणसासाठी एकही ठोस निर्णय घेता आला नाही. पण आज हे चित्र बदलले आहे.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आले. आणि पागडी सिस्टीम मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला दिलासा मिळाला. ज्या जागेत तो राहत होता त्याच जागी पुनर्बांधणीचे मोफत मालकी हक्काचे घर त्याला मिळतय. घर मालकाना एफ एस आय, टी डी आर मिळतोय.अडकलेले खटले फास्ट ट्रॅक वर आले.वाचाळवीर आणि विकास पुरुष यांच्यातील हाच खरा फरक आहे." असे प्रतिपादन वाघ यांनी केले.
हेही वाचा : BMC Election : मनपा निवडणुकीसाठी शिंदेंच्या उमेदवारचा थेट मातोश्रीबाहेर प्रचार
" १० वर्षापूर्वी कुणी सांगितलं असत की नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास वीस मिनिटात होईल तर कुणाला विश्वास बसला असता का ? कारण १९६३ पासून या पुलाच स्वप्न दाखवले गेले.५० वर्षे प्रकल्प फाईल मधेच अडकून होता.खरी गती आली २०१६ नंतर ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.तेव्हा पर्यावरण मंजुरी आणली.टेंडर निघाली आणि २०१८ ला तर कामही सुरू झाले. भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
पण त्यानंतर उबाठा चे स्थगिती सरकार आले आणि कामाचा वेगच मंदावला. आणि पुन्हा एकदा अटल सेतूचा प्रकल्प पूर्ण झाला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीमध्ये.आजही अटल सेतू चे श्रेय लाटण्याचे प्रयत्न होत आहेत.पण कल्पना कागदावर उतरवून आणि भाषण देऊन प्रकल्प पूर्ण होत नाहीत. अटल सेतू त्याचाच पुरावा आहे आणि माझे सर्व प्रिय मुंबईकर त्याचेच साक्षीदार आहेत." असेही वाघ यांनी स्पष्ट केले.