मुंबई : ( Doraemon Cartoon ) नव्वदच्या दशकातल्या मुलांचा आणि जेन झींचा लाडके कार्टून असलेला 'डोरेमॉन'ने आता प्रेक्षकांचा अखेर निरोप घेतला आहे. इंडोनेशिया या देशात ३७ वर्ष सतत प्रकाशित होत असलेला 'डोरेमॉन' टीव्ही शो अधिकृतपणे आता बंद झाला आहे.
इंडोनेशियामध्ये ९ डिसेंबर १९९० मध्ये डोरेमॉन कार्टून हा पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. मुख्यत: जपानी कार्टून असलेल्या 'डोरेमॉन' हे कार्टून पहिल्यांदा डबिंगसह इंडोनेशियामध्ये प्रकाशित झाले होते. भविष्यातून आलेला रोबोट डोरेमॉन हा गॅझेट्सच्या साहाय्याने नोबिताची मदत करत असतो. इंडोनेशियामध्ये लोकप्रिय असलेले हे कार्टून बंद झाल्यामुळे अनेक चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : आयुष–अनुष्काची ‘जब्राट’ जोडी, मालिकेनंतर आता सिनेमातही दिसणार
भारतातही डोरेमॉन बंद होणार का?
इंडोनेशियामध्ये जरी हे कार्टून बंद झाले असले तरी भारतात मात्र ते बंद होणार नाही. परंतु काही काळानंतर मात्र भारतातही 'डोरेमाँन' बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.