मुंबई : ( DGCA Bans Charging Electronic Devices on Flights ) विमानप्रवासादरम्यान आता पॉवर बँक किंवा पोर्टेबल चार्जरद्वारे मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्जिंग करण्यास नागरी विमान महासंचालनालय ( डिजीसीए ) ने प्रतिबंध घातलेत. तसेच त्यासोबत विमानातील पॉवर आऊटलेटद्वारेही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्जिंग करण्यास ही प्रतिबंध घातले.
डिजीसीएने घेतलेल्या निर्णयामागे नेमकं कारण काय?
मोबाइल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करण्यासाठी लिथियम बँटरीचा मोठया प्रमाणात वापर केला जातो परंतु यामुळे विमानात आगीच्या घटना या घडत होत्या, त्यामुळे विमान प्रवासातील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर डिजीसीएने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्याच्या विमान मार्गदर्शक तत्वानुसार प्रवासी पॉवर बँक आणि स्पेअर लिथियम बँटरी फक्त केबिन बॅगेज मध्येच घेऊन जाऊ शकतात.
जागतिक स्तरावर लिथियम बँटरीमुळे बऱ्यांच ठिकाणी आग लागण्याच्या घटना घटल्या आहेत. भारतातही आँक्टोबरमध्ये इंडिगोच्या एका विमानात पाँवर बँकला आग लागण्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर डिजीसीए ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
हेही वाचा : अमेरिकेची मोठी एक्झिट! जागतिक पातळीवरील ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय
विमान कंपन्यांनी क्रू मेंबर्सना विशेष प्रशिक्षण देण्याचेही निर्देश डीजीसीएने दिले आहेत. तसेच प्रवाशांनी पूर्ण चार्ज केलेली उपकरणे घेऊन प्रवास करावा व पॉवर बँक सुरक्षितपणे हँड बॅगेजमध्ये ठेवावे असे आवाहन ही डीजीसीएने केले आहे.