मुंबई : (Devendra Fadnavis) मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिलीच संयुक्त मुलाखत गुरूवार दि. ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली, त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष पण तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis)
हेही वाचा : Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर भाजप-एमआयएमची युती संपुष्टात
फडणवीस म्हणाले, “या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही.” तसेच, “स्वतःला ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू,” असा इशाराही त्यांनी दिला. महायुती मजबूत असून, कोणीही स्वतःला मोठा ब्रँड समजून मैदानात उतरला, तर त्याचा “बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही,” असे स्पष्ट वक्तव्य फडणवीसांनी केले. (Devendra Fadnavis)
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत महापालिका निवडणुकीच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Devendra Fadnavis)