मुंबई : (Nitesh Rane) "तुमच्या इथून हाकेच्या अंतरावर वाढवण बंदर येते आहे. आमची मुलं नोकरी करायला हैद्राबाद आणि राज्याबाहेर जातात. मात्र मी तुम्हाला शब्द देतो, वाढवण बंदरात या भागातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी लावण्याची जबाबदारी माझी असेल", असा विश्वास बंदरे आणि मस्त्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. नालासोपारा येथे भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे यांची प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक आमदार राजन नाईक हे देखील उपस्थित होते. (Nitesh Rane)
हेही वाचा : Manipur Akashvani : मणिपूर आकाशवाणीवरुन घुमणार पुन्हा थाडौ भाषेचे बोल!
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले,"वाढवण बंदर आपल्या राज्यात तुमच्या अगदी जवळ पालघरमध्ये येत आहे. मग याठिकाणी बाहेर राज्यातील कामगार कशाला हवे? याठिकाणी सर्व नोकऱ्या तुमच्याच असतील. जे काही करू ते स्थानिकांच्या अधिकारासाठी करू, तुमच्या सेवेसाठी करू त्यामुळे तुम्ही निश्चिन्त राहा. या वाढवण बंदराच्या माध्यमातून प्रत्येक घरात आर्थिक समृद्धी आणायची जबाबदारी बंदरे विकास मंत्री म्हणून माझी आहे.", असे असा विश्वास नितेश राणेंनी उपस्थितांना दिला. (Nitesh Rane)