Faiz-e-Ilahi : दिल्लीच्या 'फैज-ए-इलाही' मशिदीजवळ बुलडोझर कारवाई!

07 Jan 2026 11:58:50
 
Faiz-e-Ilahi
 
मुंबई : (Faiz-e-Ilahi) दिल्लीच्या तुर्कमान गेटजवळ मंगळवारी मध्यरात्री बुलडोझर कारवाई करण्यात आली. तुर्कमान गेट परिसरातील फैज-ए-इलाही मशिदीच्या आजूबाजूच्या बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने ही कारवाई केली. मध्यरात्रीच पालिकेचे बुलडोझर मशिदीजवळ घुसले आणि सुमारे ३२ बुलडोझरच्या साहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. मात्र या कारवाईदरम्यान परिसरात तणाव निर्माण झाला. बुलडोझर कारवाईला विरोध करत जमावाद्वारे दगडफेक करण्यात आली, त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. (Faiz-e-Ilahi)
 
मिळालेल्या माहितीनुसार, फैज-ए-इलाही मशिदीच्या ०.१९५ एकर क्षेत्राला वगळता उर्वरित बेकायदेशीर बांधकामे ज्यामध्ये लायब्ररी, दवाखाना आणि बँक्वेट हॉलचा समावेश होता; ती पाडण्यात आली आहेत. यामुळेच नंतर निर्माण झाला. मशिदीजवळील अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर मध्यरात्री दगडफेक झाली. परिसरातील लोक रस्त्यावर उतरून पोलिसांवर दगडफेक करू लागले. प्रशासनाच्या मते ही सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे आहेत, तर मशिद समिती त्यांना १०० वर्षे जुने बांधकाम असल्याचा दावा करते. स्थानिकांनी विरोध केला असला तरी प्रशासनाने मात्र ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसारच असल्याचे स्पष्ट केले. (Faiz-e-Ilahi)]
 
हेही वाचा : ‘सागर ते स्क्रीन’ची महागुंतवणूक 
 
फैज-ए-इलाही मशिदीबाहेर झालेल्या दगडफेकीप्रकरणी आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिस बॉडी कॅमेरे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा वापर करत आहेत. या कारवाईसाठी ९ जिल्ह्यांतील डीसीपी दर्जाचे अधिकारी तैनात करण्यात आले होते. सुमारे १,००० पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. मलबा हटवण्यासाठी ७० हून अधिक डंपर आणि १५० पेक्षा जास्त पालिका कर्मचारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दगडफेक २५ ते ३० जणांनी केली होती आणि ती अपेक्षित नव्हती. सध्या परिसरात बीएनएस कलम १६४ लागू करण्यात आले आहे. (Faiz-e-Ilahi)
 
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दहशतवादी उमर-उन-नबी हा फैज-ए-इलाही मशिदीत गेला होता. हीच मशिद तुर्कमान गेटजवळ आहे, जिथे मंगळवारी उशिरा रात्री बुलडोझर कारवाई करण्यात आली. अशी माहिती आहे की, स्फोटाच्या आधी उमर-उन-नबी सुमारे १५ मिनिटे या मशिदीत थांबला होता. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात तो मशिदीच्या आत दिसत आहे. दहशतवाद्याचा मशिदीत जाण्याचा उद्देश काय होता, याचा आता पोलीस तपास करत आहेत. (Faiz-e-Ilahi)
 
 
Powered By Sangraha 9.0