Waris Pathan : कलमाचे पठण करणारी मुस्लिम महिला महापौर का होऊ शकत नाही? : वारिस पठाण

05 Jan 2026 12:35:01
Waris Pathan
 
मुंबई : (Waris Pathan) मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापौरपदावरून राजकीय वाद तीव्र होत असतानाच एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. धारावी येथील रॅलीला संबोधित करताना पठाण म्हणाले की, “आमचे स्वप्न आहे की एक दिवस कलमाचे पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर व्हावी.” (Waris Pathan)
 
हेही वाचा : ठाकरेंचा ‌‘फशिव‌’नामा
 
“जर देशात मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, खासदार आणि आमदार होऊ शकतात, तर मुंबईची मुस्लिम महिला महापौर का होऊ शकत नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईचा महापौर फक्त हिंदू मराठीच असेल, असे विधान केल्यानंतर पठाण यांनी हे वक्तव्य केले आहे. (Waris Pathan)
 
हेही वाचा : पालघर - स्थलांतरी छोट्या टिलव्याकडून मानवी विष्ठेवर अन्नग्रहण; खाद्यवर्तनाची प्रथमच नोंद 
 
यावेळी वारिस पठाण (Waris Pathan) यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. मुस्लिम मतांवर हक्क सांगणारे पक्ष या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “लोकशाहीमध्ये कोणत्याही एका धर्माला किंवा जातीला सत्तेचा मक्ता देता येत नाही,” असे म्हणत पठाण यांनी या वादावर उघड भूमिका घेण्याचे आवाहन केले. (Waris Pathan)
 
 
Powered By Sangraha 9.0