डोंबिवली : (Municipal Elections) डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद उघड झाले असून, वैशाली म्हात्रे यांना पक्षाचा आदेश देत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या एका जिल्हाप्रमुखाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Municipal Elections)
हेही वाचा : BMC Election 2026 Survey: मुंबई महानगरपालिका भाजप-शिवसेनेची? नव्या सर्व्हेचे धक्कादायक अंदाज, सर्व्हेत नेमकं काय?
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ठाकरे गट जिल्हाप्रमुख तात्या माने हे वैशाली म्हात्रे यांना पक्षाचा आदेश असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करताना ऐकू येत आहेत. यावर वैशाली म्हात्रे यांनी, “माझाच बळी दिला जात आहे,” असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचेही या ऑडिओमध्ये ऐकू येते. (Municipal Elections)
हेही वाचा : Avinash Jadhav : ठाण्यातील बिनविरोध निवडणुकांवर मनसे आक्रमक; अविनाश जाधव यांच्याकडून निवडणूक आयुक्तांची भेट
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत निकालापूर्वीच तब्बल २० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. पक्ष आदेशामुळे उमेदवारांना माघार घेण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद आणि असंतोष चव्हाट्यावर आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच समोर आलेल्या या प्रकारामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, या प्रकरणावर पक्ष नेतृत्वाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Municipal Elections)