Devendra Fadnavis : मुंबई जागतिक मनोरंजन क्षेत्रात नेतृत्व करेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

05 Jan 2026 19:28:46
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) "भारताची 'क्रिएटिव्ह इकोनॉमी' आता प्रगल्भ झाली असून, मुंबई जागतिक मनोरंजन क्षेत्रात केवळ सहभागी नाही, तर त्याचे नेतृत्व करत आहे. युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये झालेली २४०० कोटींची धोरणात्मक भागीदारी ही केवळ एक घोषणा नाही तर भारत, महाराष्ट्र आणि मुंबईवरील जागतिक विश्वासाचे द्योतक आहे. ही भागीदारी 'क्रिएटिव्ह इकोनॉमी'च्या उज्ज्वल भविष्याचे प्रतिनिधित्व करेल.मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली कंपनी युनिव्हर्सल म्युझिक आणि एक्सेल एंटरटेनमेंटची धोरणात्मक भागीदारी हे सिद्ध करते."असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार दि.५ रोजी मुंबई येथे केले. (Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.५ रोजी मुंबई येथे युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यातील धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ गीतकार, कवी व पटकथा लेखक जावेद अख्तर, प्रसिद्ध अभिनेते आणि एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक फरहान अख्तर, एक्सेल एंटरटेनमेंटचे सहसंस्थापक आणि चित्रपट निर्माते रितेश सिधवानी, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट (मार्केट डेव्हलपमेंट) ॲडम ग्रॅनाइट, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे भारत व साऊथ एशियाचे चेअरमन आणि सीईओ देवराज सान्याल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : बिनविरोध निवडणूकीचा इतिहास ठाकरे बंधू विसरले आहेत: मुख्यमंत्री फडणवीस
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज समिट'मार्फत या कराराची बीजे रोवल्याबद्दल त्यांचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जागतिक कंपन्या गुंतवणुकीसाठी ५ प्रमुख गोष्टी पाहतात प्रतिभा, धोरणात्मक सातत्य, बौद्धिक संपदेचा आदर, अंमलबजावणीचा वेग व एक परिपूर्ण इकोसिस्टीम या पाचही गोष्टी महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये आहेत. याद्वारे मुंबई केवळ प्रगतीच करणार नाही, तर ती जागतिक स्तरावर नेतृत्व करेल हे सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे." (Devendra Fadnavis)
 
बॉक्स करणे
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट तसेच मुंबईच्या संपूर्ण सर्जनशील समुदायाचे अभिनंदन केले. या अफाट प्रतिभेला जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हेच महाराष्ट्र शासनाचे ध्येय आहे. मुंबईने आतापर्यंत भारताच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यापुढे ही मुंबई जगाच्या गोष्टी सांगण्यासाठी सज्ज झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0