बिनविरोध निवडणूकीचा इतिहास ठाकरे बंधू विसरले का?

    05-Jan-2026
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Uddhav Thackeray) आताच्या महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीचे जवळपास ७० उमेदवार बिनविरोध निवडणूक आले आहेत.त्यावरून विरोधक विशेषतः ठाकरे बंधूंनी महायुतीविरुद्ध अपप्रचार सुरू केला आहे.त्यामुळे बिनविरोध निवडणुकीवर आताच टीका का ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
 
"कालपरवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका इवीएमवर ठेवणारे विरोधक आता बिनविरोध वरून फेक नेरेटिव्हचे राजकारण करत आहेत. मुस्लिम पक्षाचे आणि एक अपक्ष सुद्धा बिनविरोध आले आहेत यांना फक्त महायुतीचे उमेदवार दिसले आहेत. कारण उद्या हरल्यानंतर लोकांना काहीतरी सांगायला कारण हवे." अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. (Devendra Fadnavis)
 
पण बिनविरोध निवडणुका देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्या नाहीत. उध्दव ठाकरे स्वतः २०२० ला बिनविरोध निवडून आले होते. तर १९७७ मध्ये नीलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आलेले भारताचे एकमेव राष्ट्रपती ठरले होते. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  BMC Election 2026: स्वच्छ हवा ही नागरिकांची मूलभूत गरज; महापालिका निवडणुकीत प्रदूषणमुक्त मुंबईचा मुद्दा ऐरणीवर
 
विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केल्यास नागालँड मध्ये आतापर्यंत ७७ आमदार जम्मू काश्मीरमध्ये ६३ तर अरुणाचल प्रदेशात ४० आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. लोकसभेत सुद्धा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण(१९६२) फारुक अब्दुल्ला(१९८०)आणि डिंपल यादव (२०१२)हे बिनविरोध निवडून आले होते.१९५१ च्या निवडणुकीत पाच तर १९५७ च्या निवडणुकीत सात उमेदवार लोकसभेत बिनविरोध निवडून आले आहेत.१९५१ पासून आतापर्यंत लोकसभेत ३५ उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत.ज्यातील सर्वाधिक उमेदवार काँग्रेसचे होते. 
त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडीचे प्रमाण असताना आताच का याचा विपर्यास केला जात आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधक लोकांत जाऊन सभा घेताना कुठेही दिसत नाही आहेत. ठाकरे बंधूंनी तर फक्त मुंबई महापालिका एवढेच आपले कार्यक्षेत्र मानले आहे.ना त्यांची कुठ सभा होताना दिसत आहे ना मेळावे. कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याऐवजी बिनविरोध वर टीका करून वेळ वाया घालवायचा सोपा मार्ग विरोधकांनी निवडलेला दिसत आहे. (Devendra Fadnavis)