ज्युपीटर मॅरेथॉन ठाणे स्पर्धेतील धावपटूंनी दिला मतदानाचा संदेश

04 Jan 2026 18:14:07
Thane Marathon
 
ठाणे : ( Thane Marathon ) ठाणे महानगरपालिका आणि ज्युपीटर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात ज्युपीटर मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत जवळजवळ 5 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉन दरम्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीबाबत जनजागृती करण्यात आले. स्पर्धकांनी जनजागृती करणारे बॅनर्स हातात घेवून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी, स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिताली संचेती उपस्थित होत्या. 21 ‍कि.मी, 10 कि.मी आणि ‍5 कि.मी ही स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती.
 
हेही वाचा : जगातील सर्वात मोठे शिवलिंग बिहारमध्ये दाखल
 
ठाणे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटू, नागरिक व युवक-युवती यांच्यामध्ये “मतदान हा हक्क आणि कर्तव्य आहे”, “१५ जानेवारी रोजी मतदान करूया” अशा संदेशांचे फलक, बॅनर्स व घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत स्वच्छता, जबाबदार नागरिकत्व आणि निर्भय मतदानाचा संदेश दिला. तसेच जागरुक नागरिक मी ठाण्याचा, हक्क बजावेन मतदानाचा असा संदेश असलेल्या सेल्फी पॉईटवर सेल्फी काढत धावपटूंनी मतदान करण्याचा निर्धार केला.
 
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. तसेच सहभागी धावपटूंनी मतदान करण्याची शपथ घेतली.
 
 
Powered By Sangraha 9.0