लव जिहादच्या जाळ्यातून दलित महिलेची हत्या

04 Jan 2026 18:55:02
 Love Jihad
 
मुंबई : ( Love Jihad ) कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये लव जिहादच्या जाळ्यातून एका दलित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील यल्लापूर गावामध्ये रंजिता नावाच्या एका दलित महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याने रफिक नावाच्या एका युवकाने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजिता कामावरून पायी घरी परतत असताना रफिकने तिला बोलण्यासाठी थांबवले. या दरम्यान त्याने अचानक तिच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी रंजिताला रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सध्या रंजीताच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
 
रंजीताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदू संघटनांनी आंदोलन पुकारत पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली. या संपूर्ण प्रकरणात लव्ह जिहादची भीती व्यक्त करत त्यांनी यल्लापूर बंदची हाक दिली. यावर यल्लापूर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
 
हेही वाचा : जगातील सर्वात मोठे शिवलिंग बिहारमध्ये दाखल
 
रंजीताचा भाऊ वीरभद्र यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी रफिक हा रंजीताचा हायस्कूलमध्ये वर्गमित्र होता. तो गेल्या वर्षभरापासून रंजीताच्या संपर्कात होता. गेल्या काही महिन्यांपासून रफिक तिच्यावर प्रेमासाठी दबाव आणत होता. रंजीताने रफिकला तिच्यापासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता, परंतु तो वारंवार तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होता.
 
Powered By Sangraha 9.0