मुंबई : ( Amit Satam ) "हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानेच उद्धवजी पासून उद्धव मामू पर्यंतचा प्रवास आहे. त्यामुळेच २५ वर्षात केलेले एकही काम त्यांनी आतापर्यंत दाखवले नाही.आता त्यांच्या जाहीरमान्यात नमूद केलेल्या गोष्टी त्यांनी महापालिका सत्तेत असताना केल्या का नाहीत.आतापर्यंत स्टँडिंग कमिटीच्या बैठकीनंतर पाच टक्क्याचा ते हिशेब करत होते. पाच टक्क्याचा हिशेबावर जगणारे आम्हाला मराठी माणसाच्या गप्पा शिकवत आहेत.१९९७ ते २०२२ पर्यंत उद्धव ठाकरेंनी या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत केला आहे."अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी रविवार दि. ४ रोजी ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना केली.
"फोटो दाखवून एकत्र येण्याच ढोंग केल जात आहे. २० वर्षांनी सेना भवनात पाऊल ठेवणारे याच्याआधी का नाही गेले. यांच्या फॅमिली ऑपेरात सामान्य मुंबईकरांना,मराठी माणसाला अजिबात रस नाही आहे. पालिका ताब्यात असताना उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे आम्ही दहा कामे दाखवतो. उद्धव ठाकरेंनी काम नाही तर फक्त पालिकेत भ्रष्टाचार केला."असेही साटम यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : आमदार अमीत साटम यांचा नागरिकांशी थेट संवाद
"तीन मामू एकत्र येऊन सुद्धा महाविकास आघाडीला पन्नासचा आकडा गाठता आला नाही.आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना कायमच घरी पाठवण्याच काम मुंबईकर करणार आहेत.त्यामुळे जनतेला काय करायचं आहे ते उद्धव ठाकरेंनी ठरवायची गरज नाही आहे. टोमणे बहाद्दर उद्धव ठाकरेंना येणाऱ्या १५ तारखेला भगव वादळ मुंबईत आल्यावर मुंबईकरच त्यांना उत्तर देतील." असेही साटम यांनी स्पष्ट केले.