Vinod Kulkarni : साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला!

03 Jan 2026 15:51:32
 
Vinod Kulkarni
 
सातारा : (Vinod Kulkarni) सातारा येथे सुरू असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दुसऱ्याच दिवशी गालबोट लागले आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर दुपारी १ वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. प्रकाशन कट्ट्याच्या कार्यक्रमावरून परतत असताना हा हल्ला झाला असून, हल्लेखोर कोण होता, तथा या हल्ल्या मागचा उद्देश नेमका काय या बद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. (Vinod Kulkarni)
 
या हल्ल्या संदर्भात दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना विनोद कुलकर्णी म्हणाले की " प्रकाशन कट्ट्यावरून मी परतत असताना माझ्यावर एका व्यक्तीने माझ्या डोळ्यामध्ये केमिकल टाकले. त्यावेळेस हल्लेखोर म्हणत होता की तुला संपवू, संमेलन उधळून लाव. माझा सहकारी तुषार महामुलकर, आणि माझे वकील ऍडव्होकेट चंद्रकांत बेबले यांनी या बद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पोलीस आता पुढचा तपास करतील." (Vinod Kulkarni)
 
हेही वाचा : मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या एक तास ५८ मिनिटांत
 
विश्वास पाटील यांना सुद्धा धमक्या!
 
या संदर्भात अधिक ची माहिती देताना विनोद कुलकर्णी म्हणाले की मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना सुद्धा काही अज्ञात लोकांनी धमक्या दिल्या होत्या. संमेलनाला गालबोट लावण्याची त्यांची इच्छा आहे. आता विश्वास पाटील यांच्यासोबत जर त्यांचे काही वाद असतील तर त्यांनी ते लोकशाही मार्गाने सोडवावेत. अखेर विचारांची लढाई ही विचारांनीच करायची असते असं मला वाटतं. (Vinod Kulkarni)
 
 
Powered By Sangraha 9.0