Khopoli Case: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणावर त्यांच्या मुलीची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाली, मारेकऱ्यांना...

03 Jan 2026 15:10:02
Khopoli Case
 
खोपोली : (Khopoli Case) रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिवसेना (शिंदे गट) च्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या हत्येप्रकरणावर मंगेश काळोखे यांची मोठी कन्या वैष्णवी काळोखे हिने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. (Khopoli Case)
 

हेही वाचा : Ranjit Yadav : मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचा विकासकामांचा आढावा दौरा 


“समाजसेवा करणे हाच माझ्या वडिलांचा गुन्हा होता का?” असा थेट सवाल वैष्णवीने उपस्थित केला. वडिलांनी आयुष्यभर लोकांसाठी काम केले, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी धाव घेतली, पण त्याचीच किंमत त्यांना जीव देऊन चुकवावी लागली, अशी भावना तिने व्यक्त केली. न्याय न मिळाल्यास लोकांचा कायद्यावरील विश्वास उडेल आणि सामान्य माणसालाही रस्त्यावर जाण्याची भीती वाटेल, असे मत वैष्णवी काळोखे यांनी व्यक्त केले. या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाई व्हावी, तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी तिची मागणी आहे. (Khopoli Case)


मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आपल्या छोट्या मुलीला, आर्याला शाळेत सोडून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला. या हत्येप्रकरणामुळे खोपोलीसह रायगड जिल्ह्यात राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. (Khopoli Case)
 


Powered By Sangraha 9.0