Ajit Pawar Plane Crash : विमान अपघातात वरळी बीडीडीतील पिंकी माळी या तरुणीनेही गमावला जीव

28 Jan 2026 14:20:08
Ajit Pawar Plane Crash 
 
मुंबई: (Ajit Pawar Plane Crash) महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारचा दिवस खूप दुर्देवी ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एनसीपी प्रमुख अजित पवार यांचं चार्टर्ड विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या चार्टर्ड विमानाची कमान अनुभवी पायलट कॅप्टन सुमीत कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांच्या हाती होती. पिंकी माळी या विमानात फ्लाइट अटेंडेंट होत्या. (Ajit Pawar Plane Crash)
 
हेही वाचा :  Ajit Pawar Plane Crash : आगळे वेगळे व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार...
 
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडेंट पिंकी माळी या वरळी बी डी डी चाळ बावनचाळ मधील रहिवाशी शिवकुमार माळी यांची कन्या असून, त्या विमान सेवेतील अनुभवी कर्मचारी होत्या. पिंकी माळी यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जवळपास गेल्या पाच वर्षांपासून खासगी विमान कंपन्यांसाठी फ्लाइट अटेंडेंट म्हणून काम करत होती. तिचा अपघाती मृत्यू हा त्यांच्यासाठी धक्का असल्याचेही त्यांनी सांगितले. (Ajit Pawar Plane Crash)
 
 
Powered By Sangraha 9.0