मुंबई : (Ajit Pawar Plane Crash) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आणि राज्यासह बारामती पोरके झाल्याची भावना दिसून आली. महाराष्ट्रासाठी हा एक काळा दिवसच म्हणावा लागेल.ज्या बारामतीवर अजित पवार यांचे जास्त प्रेम होते तिथेच त्यांच अकाली जाणे ही पण काळजाला चटका लागून जाणारी घटना आहे.कारण राज्यात अजित पवार कुठेही असले तरी बारामतीत त्यांचा संपर्क कायम असायचा.अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचा स्वभाव आणि रोखठोक भूमिका कायमच चर्चेत राहिली आहे.राज्यात महायुतीचे सरकार आले आणि त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतसुद्धा ,"शपथ कोण कोण घेणार?"या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना," एकनाथ शिंदे यांच माहित नाही पण मी मात्र शपथ घेणार."अशी टिप्पणी त्यांनी पत्रकारांसमोर केली होती.अन् त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह उपस्थितांत जोरदार हशा पिकला होता. अजित पवार यांच्या भाषणाचे वेगळेपण खूप लोकप्रिय होते.एकदा एका भाषणात अजित पवार हे पुणे जिल्ह्यातील काही मुले नासामध्ये गेल्याचे सांगत होते आणि त्याच वेळी एक कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली की रस्त्यावर मोकाट जनावरे वाढली आहेत त्याचा बंदोबस्त करा तेव्हा आपल्या मिश्किल भाषेत त्यांनी ,"मी काय सांगतोय आणि याला काय लागलंय."असे उत्तर दिले होते.(Ajit Pawar Plane Crash)
कोल्हापूर मध्ये तालमीचा इतिहास मोठा आहे.त्यामुळे अजित पवार जेव्हा कोल्हापुरात यायचे तेव्हा तेथील तालमीना भेट द्यायचे.आणि तेथील अडचणी समजून घ्यायचे.(Ajit Pawar Plane Crash)
काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांना आता बंटी म्हणू नका असा सल्ला त्यांनी भाषणात दिला होता. पिंपरी चिंचवडमध्ये सांगावी येथे सभा सुरू असताना सभास्थळी एक भटके कुत्रे आले होते तेव्हा त्याकडे पाहत," ते बघा तेही इथ काही सांगायला आले आहे." असे उद्गार त्यांनी काढले होते.(Ajit Pawar Plane Crash)
एका सभेवेळी कार्यकर्त्याने," दादा आय लव यू" अशी सभेत हाक दिली होती तेव्हा,"घरी जाऊन बायकोला म्हण म्हणजे ती म्हणते की गडी लईच बिघडला आहे."असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. पिंपरी चिंचवड मधील निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने,"तुम्हाला रॉकी भाई म्हटले आहे."असे विचारताच ,"मी तो चित्रपट बघितला नाही,बघितला की सांगतो योग्य की अयोग्य म्हटलं आहे." असा टोला अजित पवार त्यांनी पत्रकारांना लगावला होता.(Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार यांच्यावर कार्यकर्त्यांचे खूप प्रेम होते.पुण्यातील एका रोड शो मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा उपाध्यक्ष करण गायकवाड या कार्यकर्त्याने क्रेनला लटकून अजित पवार यांना गुलाबी हार आणि महात्मा फुले यांची पारंपरिक पगडी घातली होती. "आपल्या विश्वासू राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय."ही अजित पवार यांची शेवटची पोस्ट ठरली होती. अजून एक योगायोग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आहे घड्याळ आणि अपघातात अजित पवार यांनी मनगटात घातलेल्या घड्याळाने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली होती.(Ajit Pawar Plane Crash)
राज्याशी जोडलेल्या अनेक आठवणी मागे ठेऊन हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले ज्यामुळे राज्य पोरके झाल्याची भावना आज सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.(Ajit Pawar Plane Crash)