Ajit Pawar Plane Crash : "बाबा मी अजितदादांसोबत प्रवासात आहे! उद्या बोलू!, उद्या उजाडणारच नाहीये!", पिंकी माळीच्या वडिलांना अश्रू अनावर

28 Jan 2026 17:10:19
 
Ajit Pawar Plane Crash
 
मुंबई: (Ajit Pawar Plane Crash) महाराष्ट्र झोपेतून उठून आपल्या कामाला निघण्याची तयारी करत असतानाच, एक धक्कादायक बातमी समोर आली, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. दिलदार, दिलखुलास आणि व्हिजनरी दादा नेतृत्वाच्या अकाली निधनाने महाराष्ट्रात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवारांसमवेत या विमानात दोन पायलट, १ क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, पिंकी माळी या तरुण क्रू मेंबर युवतीचा मृ्त्यू झाला असून तिच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. (Ajit Pawar Plane Crash)
 
हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
 
पिंकी माळी ही तरुण युवती त्या विमानात क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती. पिंकीचे पूर्ण नाव हे कर्तु शिवकुमार माळी असं असून ती मुंबईत राहत होती. वरळीतील बी डी डी चाळ नं २९ येथील रहिवाशी शिवकुमार माळी यांची ती कन्या असून गेल्या काही वर्षांपासून खासगी विमानांमध्ये फ्लाईट अटेंडन्ट म्हणून काम करायची. पिंकी दररोज आपल्या कुटुंबियांना आवर्जून मेसेज करायची, त्यांच्याशी फोनवर बोलायची, पण आज जेव्हा तिचा काही प्रतिसाद आला नाही, तेव्हाच कुटुंबीयांना भीती वाटायला लागली होती आणि दुर्दैवाने त्यांची भीती खरी ठरली. पिंकीचे वडील स्वतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, काही दिवसांपूर्वी पिंकी आपल्या वडिलांचं अजित पवारांशी बोलण करून देणार होती, पण त्यावेळी वडिलांनी फोन न उचलल्याने बोलणं होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर, "आज मी तुमचं दादांशी नक्की बोलणं करून देईन", असं पिंकीने आपल्या वडीलांना सांगितलं होतं. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि होत्याच नव्हत झालं. (Ajit Pawar Plane Crash)
 
 
Powered By Sangraha 9.0