Ajit Pawar Plane Crash: 'माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

28 Jan 2026 12:29:15


 
Ajit Pawar Plane Crash
 
मुंबई : (Ajit Pawar Plane Crash) महाराष्ट्राच्या राजकारणाला २८ जानेवारी २०२६ रोजी मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले असून, संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले, "मी माझा दमदार आणि दिलदार मित्र गमावला आहे." (Ajit Pawar Plane Crash)
 
हेही वाचा :  Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांसोबत विमानात कोण कोण होते?

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Ajit Pawar Plane Crash)


दादा गेले!
 
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.

मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.
थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे. (Ajit Pawar Plane Crash)
Powered By Sangraha 9.0