Ajit Pawar Plane Crash: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना...

28 Jan 2026 11:15:37
 
Ajit Pawar Plane Crash
 
बारामती: (Ajit Pawar Plane Crash) महाराष्ट्राच्या राजकारणाला २८ जानेवारी २०२६ रोजी मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले असून, संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले आहेत. (Ajit Pawar Plane Crash)
 
हेही वाचा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती मिळत आहे. अपघात सकाळी बारामती एअरफिल्डजवळ घडला असून, विमानात अजित पवार यांच्यासह इतर पाच जण होते, ज्यात विमानचालक आणि काही कर्मचारी सामील होते. (Ajit Pawar Plane Crash)
 
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. १९९१ मध्ये पहिल्यांदा विधानसभा सदर असलेले पवार हे गेल्या तीन दशकांत अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जामंत्री अशी अनेक खाती सांभाळणारे नेते होते. पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. 'अजित दादा' म्हणून ओळखले जाणारे पवार हे महायुती सरकारमधील प्रमुख नेते होते. (Ajit Pawar Plane Crash)
 
 
Powered By Sangraha 9.0