उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

    28-Jan-2026   
Total Views |


मुंबई, दि. २८ : मुंबईहून बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बारामती येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, लॅंडिंग करताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.

बुधवारी, सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजता दरम्यान बारामती विमानतळाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदिप जाधव, पिंकी माळी, क्रृ मेंबर सुमीत कपूर, शांभवी पाठक यांच्यासह आणखी काहीजण या विमानात होते. बारामती येथे सभेसाठी जात असताना अचानक विमान लँडिंगदरम्यान खाली कोळसले. विमानाचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली. अपघाताची माहिती कळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. परंतू, हा अपघात इतका भीषण होता की, यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राज्यभरात हळहळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. कुणाच्याही हाकेला धावून येणारे नेते अशी अजितदादांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....