Dattatreya Hosabale: भारताच्या एकात्मतेची जपणूक आणि सीमांचे संरक्षण हेच आपले परम राष्ट्रीय कर्तव्य!

27 Jan 2026 12:08:06
 
Dattatreya Hosabale
 
मुंबई : (Dattatreya Hosabale) "भारताच्या राष्ट्रध्वजाची, संविधानिक मूल्यांची, भारतीय प्राचीन व सनातन आत्मतत्त्वांची अखंड रक्षा व संवर्धन करण्याच्या संकल्पाचा हा दिवस आहे. भारत एक यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात प्राचीन काळापासूनच गणराज्याची संकल्पना अस्तित्वात आहे. जगाला गणराज्य व्यवस्थेचे आदर्श दाखवणारा आपला भारत देश आहे. आपल्या संविधानाची रक्षा करणे, भारताची एकात्मता व एकता जपणे आणि भारताच्या सीमांचे संरक्षण करणे हे आपले परम राष्ट्रीय कर्तव्य आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केले. (Dattatreya Hosabale)
 
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केशव स्मारक समितीतर्फे झंडेवालान येथील ‘केशव कुंज’ येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय ध्वज फडकावून सरकार्यवाहंनी ध्वजवंदन केले. (Dattatreya Hosabale)
 
हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण हटणार; तीन दिवस चालणार कारवाई
 
महाभारतातील भीष्म पितामहांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, भीष्म पितामहांनी राजधर्म, प्रजाधर्म आणि राष्ट्राप्रती कर्तव्य यांचा जो मार्ग दाखवला, तो आजही तितकाच उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. चारित्र्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेवर आधारित जीवन हाच खरा प्रजाधर्म आहे; तर सज्जनांचे संरक्षण करणे आणि दुष्ट शक्तींचा नाश करणे हे राजधर्माचे मूलभूत तत्त्व आहे. भीष्म पितामहांनी जी शिकवण दिली, तीच भारताची सनातन परंपरा आहे. ती आजच्या आधुनिक युगातही तितकीच सुसंगत असून संपूर्ण विश्वासाठी एक श्रेष्ठ आदर्श आहे. त्यामुळे भारताच्या प्रजासत्ताकाचे संरक्षण करण्यासाठी समाजाप्रती प्रेम, आपुलकी, संवेदनशीलता, दुर्बल घटकांप्रती स्नेह व आत्मीयता आणि सेवाभाव ठेवणे आवश्यक आहे. (Dattatreya Hosabale)
 
पुढे ते म्हणाले, भारताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक आयामात जीवनाचा विकास साधण्यासाठी प्रत्येक क्षण, प्रत्येक कण प्रयत्नशील राहिले पाहिजे. संघाच्या स्वयंसेवकांनी गेल्या शंभर वर्षांपासून हीच साधना केली आहे; भारताच्या प्रजासत्ताकाचे संरक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रधर्माची जाणीव ठेवून त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाणे. हा संदेश केवळ लक्षात ठेवणेच नव्हे, तर आपल्या जीवनात सतत सक्रिय व सजग राहून त्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी पुढे जाणे आवश्यक आहे. (Dattatreya Hosabale)
 
 
Powered By Sangraha 9.0